BGMI  Dainik Gomantak
अर्थविश्व

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! 'या' दिवसापासून स्मार्टफोनवर घेता येणार आनंद

BGMI ने सोशल मिडियावर ट्विट करत लोकांना गेम कधी खेळता येइल याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

BGMI Latest News: BGMI वरून बंदी उठवल्यानंतर, गेमर्स आनंदी आहेत. तसेच हा गेम खेळण्यासाठी उत्सुक आहेत. बीजीएमआय अद्याप प्लेस्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही.

दरम्यान, BGMI ने आपल्या युजर्ससाठी एक खुशखबर शेअर केली आहे. या कंपनीने ट्विट केले आहे की हा गेम आजपासून म्हणजेच 27 मे पासून प्री-लोडिंगसाठी उपलब्ध असेल. युजर्स 29 मे पासून iOS आणि Android स्मार्टफोनवर गेम खेळण्याचा आनंद घेउ शकणार आहेत. म्हणजेच, ते डाउनलोडसाठी उपलब्ध असणार आहे.

भारत सरकारने BGMI ला तीन महिन्यांची तात्पुरती मान्यता दिली आहे. यादरम्यान अधिकारी या खेळावर लक्ष ठेवणार आहेत. खेळाने कोणताही नियम मोडला तर त्यावर बंदी घालता येते. 

आयटी मंत्री चंद्रशेखर म्हणाले, BGMI ला तीन महिन्यांची तात्पुरती मान्यता देण्यात आली आहे. कारण कंपनीने सर्व्हर लोकेशन्स आणि डेटा सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवर नियमांचे पालन करण्याचे सांगितले आहे. यादरम्यान सरकार गेमवर लक्ष ठेवणार असून त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. 

  • गेममध्ये नवीन नियम येत आहेत 

BGMI काही नवीन नियमांसह परत आले आहे.या गेम मध्ये प्लेअर्सच्या सुरक्षेसाठी काही बदल करण्यात आले आहे.  18 वर्षांपेक्षा लहान असलेल्या लोकांना त्यांच्या पालकांमार्फत गेममध्ये लॉग इन करावे लागेल. तसेच, गेमर्स केवळ OTP द्वारे लॉग इन करू शकणार आहे.

क्राफ्टन या गेमच्या विकसकाने 18 वर्षाखालील मुलांसाठीही यात मर्यादा घातली असून ते दिवसातून केवळ 3 तास हा गेम खेळता येणार आहे. यापूर्वी अनेक मुलांनी हा गेम खेळू न दिल्याने त्यांच्या पालकांना दुखावले असल्याने हे निर्बंध घालण्यात आले आहेत. 

याशिवाय गेमर्स एका दिवसात गेममध्ये फक्त 7,000 रुपये गुंतवू शकणार आहे. मुलांना व्यसनाधीनता लागू नये म्हणून हे सर्व नियम करण्यात आले आहेत. 

बीजीएमआय म्हणजेच बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया ही गेम पब्जी या गेमच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती. PUBG ही चिनी गेम बॅन झाल्यानंतर भारतातील गेमिंग नियमांना लक्षात घेत BGMI तयार करण्यात आली होती.

पण हा गेम क्राफ्टॉन या दक्षिण कोरियातील कंपनीने तयार केली आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या कारणास्तव या गेमवर बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, याबाबत क्राफ्टॉनकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही गेम पुन्हा आपल्या भेटीला येण्याची शक्यता रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात येत आहे. बॅन होण्यापूर्वी या गेमचे भारतात सुमारे 100मिलियन यूझर्स होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT