Telecom Sector new rules  Dainik Gomantak
अर्थविश्व

Telecom Rules: सावधान! मोबाईलचा वापर 'या' कारणांसाठी करत असाल तर... पुढच्या 5 दिवसात नंबर होऊ शकतो बंद

Telecom Rules: टेलिकॉमने अशा 10 अंकी क्रमांकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

New Telecom Rules: सध्या अनेक कंपन्या सामान्य 10 अंकी क्रमांकावरून प्रमोशनल मेसेज किंवा कॉल करतात. हे नियमांच्या विरुद्ध असल्यानं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं ( TRAI ) आता असे नंबर ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कारण प्रमोशनल कॉलसाठी जारी केलेले नंबर 10 पेक्षा जास्त अंकांचे असतात. ज्या नंबरचा वापर एखाद्या व्यवसायाचे प्रमोशन करण्यासाठी कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी केला जातो, टेलिकॉमने अशा 10 अंकी क्रमांकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाईल फोन वापरकर्त्यांना अशा प्रमोशनल मेसेज किंवा कॉलचा त्रास होऊ नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एखादा वापरकर्ता सामान्य नंबरवरून प्रमोशनल कॉल करताना आढळला तर त्याचा नंबर 5 दिवसांच्या आत ब्लॉक केला जाऊ शकतो.

अलिकडे प्रमोशनल कॉल साठी सामान्य 10 अंकी नंबरचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा नंबरमुळे वापरकर्त्या व्यक्तीला एखाद्या कंपनीचा नंबर आहे की एखाद्या व्यक्तीचा हे समजण्यास अडचण निर्माण होत होती.

कोणत्या नंबरचा फोन घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही हे प्रत्येक व्यक्तीचा निवडीचा स्वातंत्र्य आहे, हक्क आहे. वापरकर्त्या व्यक्तींच्या हक्कांसाठी टेलिकॉमने हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: पैसा खळाळणार! त्रिपुष्कर योग ठरणार फलदायी; 'या' 5 राशींचे दिवस बदलणार

Goa Accident: डिचोलीत भीषण अपघात! बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

Chorao Ferryboat: निष्काळजीपणामुळे बुडाली होती 'बेती फेरीबोट'! चोडण दुर्घटनेबाबत बंदर कप्तान खात्याचा अहवाल सादर

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

Shelvan Jetty: '..गावात जेटी होऊ देणार नाही'! शेळवण-कुडचडेवासीयांचा निर्धार; आमदार काब्राल यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT