12 रुपयांमध्ये एक वर्षांचा विमा,जाणून घ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

12 रुपयांमध्ये एक वर्षांचा विमा,जाणून घ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल

तुम्हाला विमा योजनेबद्दल जाणून आश्चर्य वाटेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 12 रुपये खर्च करून म्हणजे महिन्याला 1 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती कव्हरेज मिळेल.

दैनिक गोमन्तक

आजकाल विमा (Insurance) घेणे हे स्वस्त काम नाही आणि तुम्हाला यामध्ये वर्षाला हजारो रुपये (Money) खर्च करावे लागतात. अपघाती विमा झाल्यास हा विमा खूप उपयुक्त ठरतो. परंतु खाजगी कंपन्यामध्ये त्याचे प्रीमियम दर खूप जास्त आहेत. अशावेळी अपघाती कव्हरेजसह (Accidental coverage) विमा काढणे सर्वसामान्यासाठी सोपे नाही. देशातील लोकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अशी योजना आहे जी त्यांना दरवर्षी केवळ 12 रुपये खर्चून अपघात विमा (Accidental Insurance) किंवा अपघाती संरक्षण देवू शकते. सरकारच्या अशाच योजनाबद्दल जाणून घ्या.

* योजनेची सुरूवात कधी झाली

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना काय आहे याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी 28 फेब्रूवारी 2015 रोजी त्यांच्या वार्षिक बजेट 2015-16 मध्ये केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश ज्यांच्याकडे जीवन विमा नाही त्या लोकांना संरक्षण विमा प्रदान करणे आहे. या विमा योजनेअंतर्गत 12 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर अपघात विमा केला जाईल. ही योजना 18 ते 70 वयोगटातील लोकांसाठी आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) ही एक प्रकारची अपघात विमा पॉलिसी (Policy) आहे. या अंतर्गत आपघातामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमाच्या रकमेवर दावा केला जाऊ शकतो.या विमा अंतर्गत आपघतामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास संरक्षण विमा म्हणून 2 लाख रुपये मिळतील.

* कोणी अर्ज करावे

या योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील लोक अर्ज अकरू शकतात. यासाठी वर्षाला 12 रुपये प्रीमियम म्हणू भरावे लागतील. ही योजना 1 वर्षासाठी वैध असेल, ज्याचे दर एक वर्षाने नूतनीकरण करावे लागेल.

* अटी कोणत्या

  • 18 ते 70 वयोगटातील लोकांचा या योजनेचा लाभ घेता येईल

  • आधार कार्ड आवश्यक आहे

  • जर एका ग्राहकाकडे 1 किंवा अधिक बचत खाती असतील तर ते कोणत्याही एका बचत खात्याद्वारे योजनेत सामील होऊ शकतात.

* प्रीमियम पेमेंट

या योजनेसाठी धारकाला वर्षाला फक्त 12 रुपये भरावे लागतील, जे बँकद्वारे थेट खात्यातून कट होतील.

* अर्ज कसा करावा

नोंदणी करण्यासाठी खातेधारकाने त्याच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेवर लोंग इन करावे लागेल. जिथे बचत खाते आहे. एका बँक (Bank) खात्यावरून फक्त एकच व्यक्ति लाभ घेवू शकतो. या योजनेचे 1 जुन ते 31 मे पर्यंत एक वर्षाचे कव्हर आहे. ज्याचे दरवर्षी बँकेमार्फत नूतनीकारण करावे लागते. विमाधारकाच्या खात्यातून दरवर्षी 1 जून रोजी किंवा त्यापूर्वी ऑटो-डेबिट सेवेद्वारे कापून घेतलेल्या सर्व करासह योजनेतील प्रीमियमची रक्कम प्रती वर्ष 12 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT