Rs 2000 currency note
Rs 2000 currency note  Dainik Gomantak
अर्थविश्व

2000 च्या नोटा चलनातून बाद केल्याचा फायदा की तोटा? RBI ने शेअर केला महत्त्वपूर्ण डेटा

Ashutosh Masgaunde

Benefit or loss of demonetisation of 2000 notes? Important data shared by RBI:

2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. आता आरबीआयने या निर्णयाचे सकारात्मक फायदे सांगितले आहेत.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, करन्सी इन सर्क्युलेशन 9 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 3.7 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी एका वर्षापूर्वी 8.2 टक्के होती.

करन्सी इन सर्क्युलेशन (CIC) म्हणजे चलनात असलेल्या नोटा आणि नाणी. त्याच वेळी, लोकांकडे असलेले चलन म्हणजे बँकांमध्ये जमा केलेल्या रोख रकमेपेक्षा कमी चलनात असलेल्या सध्याच्या नोटा आणि नाणी.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, जानेवारीमध्ये व्यावसायिक बँकांमधील ठेवी दुहेरी अंकांनी वाढल्या आहेत. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, राखीव चलन (RM) ची वाढ 9 फेब्रुवारी 2024 रोजी 5.8 टक्क्यांपर्यंत घसरली, जी एका वर्षापूर्वी 11.2 टक्के होती.

राखीव चलनामध्ये RBI मधील बँकांच्या ठेवी आणि करन्सी इन सर्क्युलेशन व्यतिरिक्त आरबीआय मधील इतर ठेवींचा समावेश होतो.

आरबीआयच्या मते, राखीव चलनाचा सर्वात मोठा विभाग असलेल्या करन्सी इन सर्क्युलेशनची वाढ एका वर्षापूर्वी 8.2 टक्क्यांवरून 3.7 टक्क्यांवर घसरली आहे. यामागे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय आहे, हे उघड आहे.

31 जानेवारीपर्यंत, 2,000 रुपयांच्या नोटांपैकी सुमारे 97.5 टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. मात्र, अजूनही देशातील लोकांकडे 2000 रुपयांच्या 8,897 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही आहेत.

19 मे 2023 रोजी चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. अशा नोटा असणाऱ्या सार्वजनिक आणि संस्थांना सुरुवातीला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या बदलून घेण्यास किंवा बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले होते.

नंतर ही मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली. 8 ऑक्टोबर 2023 पासून, लोकांना RBI च्या 19 कार्यालयांमध्ये चलन बदलण्याचा किंवा त्यांच्या बँक खात्यांमध्ये समान रक्कम जमा करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे.

मोदी सरकारने 5,00 आणि 1,000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. यानंतर, इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर, 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

RBI च्या म्हणण्यानुसार, 2018-19 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत, आरबीआयने 19 मे 2023 रोजी देशात चलनात असलेली 2000 रुपयांची सर्वोच्च नोट काढून घेण्याची घोषणा केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

SCROLL FOR NEXT