Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: पीएम किसानच्या हप्त्यापूर्वी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा, 14 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

PM Kisan 14th Instalment: केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक नवे पाऊल उचलले आहे.

Manish Jadhav

SATHI App And Portal: जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याचीही वाट पाहत असाल तर त्याचे पैसे मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाऊ शकतात.

मात्र त्याआधीच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशातील शेतकऱ्यांना (Farmers) मदत करण्यासाठी एक नवे पाऊल उचलले आहे.

बनावट बियाणांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन अॅप जारी केले आहे. देशातील सर्व 14 कोटी शेतकऱ्यांना या अॅपचा लाभ मिळणार आहे.

पोर्टल आणि मोबाईल अॅप जारी केले

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी बनावट बियाणांच्या प्रमाणीकरणासाठी पोर्टल आणि मोबाईल अॅप जारी केले.

एका निवेदनानुसार, तोमर यांनी 'साथी' (SATHI अॅप) (सीड ट्रेसेबिलिटी, ऑथेंटिकेशन आणि होलिस्टिक इन्व्हेंटरी) नावाचे पोर्टल आणि मोबाइल अॅप लॉन्च केले.

हे अॅप बियानांच्या गुणवत्तेचा मागोवा घेणे, प्रमाणीकरण आणि साठवणुकीसाठी केंद्रीकृत ऑनलाइन प्रणाली आहे.

एनआयसीने कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने केले

बियाणे उत्पादन, दर्जेदार बियाणे ओळखणे आणि बियाणे प्रमाणीकरण या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे.

एनआयसीने 'सर्वोत्तम बियाणे-समृद्ध शेतकरी' या थीमवर कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित केले आहे.

यावेळी तोमर म्हणाले की, विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून कृषी (Agriculture) क्षेत्रासमोरील आव्हाने आणि अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT