Bank Strike Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Strike: पुढील आठवड्यात देशभरात बँकांचा संप, एटीएमसह इतर सेवांवर होणार परिणाम

Bank Strike Update: पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bank Strike On 19th November: जर तुमचे पुढील आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने एक दिवसीय संप पुकारला आहे.

देशभरात बँकांचा संप

बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली की, 'ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या सरचिटणीस यांनी इंडियन बँक असोसिएशनला संपावर जाण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये युनियनने आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाण्याचे म्हटले आहे. म्हणजेच, 19 नोव्हेंबरला बँकांचे काम ठप्प होणार आहे.'

बँकेने माहिती दिली

संपाच्या दिवशी बँक शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरु ठेवण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, पण बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँक शाखा आणि कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असेही बँकेने (Bank) म्हटले आहे. वास्तविक, 19 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवारी येत आहे. बँक प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहते. मात्र या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारीही संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित होणार आहेत.

अशा स्थितीत, शनिवारी संपामुळे कामकाज बंद राहणार असून, दुसऱ्या दिवशी रविवार असणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते या आठवड्यातच करा. पुढचा दिवस रविवार असल्याने सर्वसामान्यांना दोन दिवस एटीएममध्ये (ATM) रोकड तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trump Tariffs on India: वाढीव आयात शुल्काचे भारतावर घोंघावतेय विघ्न, 50 टक्के भार; दागिने उद्योगावर परिणाम

Vasco: मुरगाव बंदरामध्ये बार्जला जलसमाधी, आठजण बचावले; जहाजाच्या अवशेषांना धडकून अपघात

World Chess Championship 2025: 23 वर्षांनंतर 'विश्वकरंडक बुद्धिबळ' स्पर्धा गोव्यात रंगणार, 30 ऑक्टोबरपासून जगभरातील 206 खेळाडूंत चुरस

Ganesh Festival 2025: चराचरांत आनंदपर्वाची अनुभूती, विघ्नहर्त्याच्या स्वागताला गोमंतकीय सज्ज; सार्वजनिक मंडळेही गजबजली

Rashi Bhavishya 27 August 2025:कामात सकारात्मक बदल, महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला; जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT