FM Nirmala Sitharaman
FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Privatisation: मोठी बातमी! मार्च 2024 पर्यंत 'ही' बँक होणार प्रायव्हेट, लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने केली घोषणा

Manish Jadhav

Bank Privatisation Update: खासगीकरणाबाबत वेळोवेळी बातम्या येत आहेत. आतापासून बरोबर एक वर्षांनी निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सरकार करत आहे. यातच आता केंद्र सरकारने निर्गुंतवणूकीची प्रक्रिया पुढे नेण्याची योजना आखली आहे.

माहिती देताना, अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) सांगितले की, '31 मार्च 2024 पर्यंत सरकार बँकेचे खाजगीकरण पूर्ण करु शकते. यावेळी सरकार (Government) आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणावर भर देत आहे.'

दिपमकडून ही माहिती मिळाली

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) सांगितले आहे की, सरकार IDBI बँकेची निर्गुंतवणूक प्रक्रिया 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करु शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहिती देताना अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'आमचे लक्ष आता पाइपलाइनमध्ये सुरु असलेली कामे पूर्ण करण्यावर आहे.

सध्या, कोणत्याही नवीन सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे खाजगीकरण करण्यासाठी कोणतीही योजना आखली जात नाही.'

किती हिस्सा उरणार?

दीपमने ऑक्टोबर 2022 मध्ये आयडीबीआय बँकेतील 30.48 टक्के समभागांसह एलआयसीचे 30.24 टक्के स्टेक विकण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) सरकार आणि एलआयसीचा संयुक्तपणे 94.72 टक्के हिस्सा आहे, जो धोरणात्मक विक्रीनंतर 34 टक्क्यांवर येईल.

पहिल्या 2 बँकांचे खाजगीकरण जाहीर करण्यात आले

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021 च्या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात 2 सरकारी बँका प्रायव्हेट हातात देण्याची घोषणा केली होती.

परंतु कोरोना महामारीमुळे परिस्थिती बदलली आणि त्यामुळे बँकांचे खाजगीकरण पुढे नेले जाऊ शकले नाही. सध्या सूत्रांच्या हवाल्याने मिळत असलेल्या माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हे शक्य नाही.

IDBI बँक खरेदी करण्याच्या शर्यतीत कोण आहे

कार्लाइल ग्रुप, फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्ज आणि डीसीबी बँक ही बँक खरेदी करण्यात खूप रस दाखवत आहेत.

या वृत्ताच्या दरम्यान बुधवारी बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण IDBI बँकेतील सुमारे 10 टक्के हिस्सेदारीसाठी बोली लावू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT