Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank of Maharashtra: 'या' सरकारी बँकेने दिला मोठा झटका, व्याजदर वाढीची केली घोषणा!

MCLR: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

Bank of Maharashtra MCLR: तुमचेही खाते बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

या अंतर्गत, MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवला आहे. MCLR मधील बदल 15 एप्रिल 2023 पासून लागू होईल. एक वर्षाचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढून 8.50 टक्के झाला आहे.

नवीन दर 15 एप्रिलपासून लागू करण्यात आले

त्याचा परिणाम असा आहे की, व्हेईकल, पर्सनल आणि होमलोन घेणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध असलेल्या कर्जाचा व्याजदर एक वर्षाच्या MCLR वर आधारित असतो.

एक दिवस आणि एक महिन्यासाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 7.90 टक्के आणि 8.10 टक्के करण्यात आला आहे.

बँकेने 15 एप्रिलपासून नवे दर लागू केले आहेत. यापूर्वी, आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने (HDFC Bank) MCLR दरात कपात करण्याची घोषणा केली होती.

85 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात

एचडीएफसी बँकेने निवडक मुदतीसाठी आपला MCLR 85 बेसिस पॉइंट्सपर्यंत कमी केला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 10 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

MCLR मध्ये कपात केल्यानंतर नवीन MCLR 7.80 टक्के झाला आहे. पूर्वी तो 8.65 टक्के होता. बँकेच्या वेबसाइटनुसार, एका महिन्याचा MCLR 8.65 टक्क्यांवरुन 7.95 टक्क्यांवर आला आहे. यामध्ये 70 बेसिस पॉइंट्सची मोठी घट झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT