Bank Holidays Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holidays: आताच बँकेची कामं संपवा! मे महिन्यात 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी

Bank holidays in May 2025: एप्रिल महिना संपत आला असून मे महिना सुरु होण्यास दोन शिल्लक आहेत. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल, तर मे महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत हे आधीच जाणून घ्या.

Manish Jadhav

Bank Holidays in May 2025: एप्रिल महिना संपत आला असून मे महिना सुरु होण्यास दोन शिल्लक आहेत. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल, तर मे महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत हे आधीच जाणून घ्या. रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार, मे महिन्यात बँका एकूण 13 दिवस बंद राहणार आहेत, परंतु या सुट्ट्या एकत्र नसून वेगवेगळ्या प्रसंगी आणि तारखांना असतील. या बँक सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या-चौथ्या शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. याशिवाय, काही सण आणि वर्धापनदिन आहेत, ज्यामुळे बँका बंद राहतील.

मे महिन्यात बँका (Bank) कोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणांसाठी बंद राहतील? बँक सुट्ट्यांच्या यादीतून तुम्हाला याबद्दल माहिती मिळू शकेल. चला तर मग मे महिन्यात बँका कधी आणि कुठे बंद राहतील ते जाणून घेऊया...

मे महिन्यातील बँक सुट्ट्या

गुरुवारी (1 मे) कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन देखील आहे. या दिवशी देशातील काही निवडक राज्यांमध्ये बँका बंद राहतात. राज्य दिनानिमित्त महाराष्ट्रात बँका बंद राहतील. तर, कामगार दिनामुळे बिहार, गोवा (Goa), मणिपूर, गुजरात, केरळ, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल आणि आसाममध्येही बँका बंद राहतील.

4 मे ते 11 मे दरम्यान बँका कधी बंद राहतील?

रविवारी (4 मे)- बँकांना साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

बुधवारी (8 मे) गुरु रवींद्र जयंती आहे. यानिमित्त नवी दिल्ली, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.

शनिवार (10 मे)- हा महिन्याचा दुसरा शनिवार असून देशभरातील बँका बंद राहतील.

रविवार (11 मे) बँकांना साप्ताहिक सुट्टीचा असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

12 मे रोजी बँका बंद राहतील की नाही?

सोमवारी (12 मे) बुद्ध पौर्णिमा आहे. यानिमित्ताने देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मिझोराम, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये बँका बंद राहतील.

16 मे ते 30 मे दरम्यान बँका कधी बंद राहतील?

शुक्रवारी (16 मे) सिक्कीम राज्य दिन असून फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

रविवार (18 मे) हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने देशभरात बँका बंद राहतील.

24 मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

रविवार (25 मे) हा साप्ताहिक सुट्टीचा असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

सोमवारी (26 मे) काझी नजरुल इस्लाम जयंती असल्याने त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.

गुरुवारी (29 मे) महाराणा प्रताप जयंतीनिमित्त असल्याने हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये बँका बंद राहतील.

शुक्रवारी (30 मे) श्री गुरु अर्जुन देव जी यांचा शहीद दिवस असल्याने देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth : लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT