Ayushman Bharat Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

Ayushman Bharat Yojana: मोफत उपचारांसाठी बनवा आयुष्मान कार्ड बनवा! वाचा कसा करावा अर्ज

Ayushman Bharat Yojana: तुम्हालाही आयुष्मान कार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्या घरातील जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रावर जाउन करू शकता.

दैनिक गोमन्तक

केंद्र आणि राज्य सरकार देशातील प्रत्येक गरीब वर्गासाठी विविध योजना राबवतात. यातील अनेक योजना महिला, मुले, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठीही चालवल्या जातात. आजही भारतातील मोठ्या लोकसंख्येला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत.देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला चांगल्या आरोग्य (Health) सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने एक उत्तम योजना सुरू केली आहे.

आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) किंवा प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला हेल्थ कार्ड (Health Card) मिळते, ज्याद्वारे त्याला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार मिळतात. या हेल्थ कार्डला आयुष्मान गोल्डन कार्ड असेही म्हणतात.

देशातील विविध राज्य सरकारांनीही आपापल्या परीने ही योजना लागू केली आहे. तुम्हालाही आयुष्मान गोल्डन कार्ड मिळवायचे असेल, तर तुम्ही यासाठी नोंदणी करू शकता. आयुष्मान भारत योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी काय आवश्यक आहे हे जाणून घेउया.

आयुष्मान गोल्डन कार्ड कसे डाउनलोड करावे-

  • सर्वप्रथम https://pmjay.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करा.

  • तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.

  • तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल आणि पुढील पेजवर तुमच्या अंगठ्याचा ठसा तपासा.

  • Approved Beneficiary च्या पर्यायावर क्लिक करा.

  • सिद्ध गोल्डन कार्ड्सची यादी तपासा.

  • तुमचे नाव तपासा.

  • पुढे तुम्हाला CSC वॉलेटवर क्लिक करावे लागेल आणि तुमचा पासवर्ड टाकावा लागेल.

  • पुढे पिन प्रविष्ट करा आणि मुख्यपृष्ठावर या.

  • तुम्हाला आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.

  • त्यावर क्लिक करून आयुष्मान गोल्डन कार्ड डाउनलोड करा.

आयुष्मान गोल्डन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-

  • अर्जदाराचे आधार कार्ड

  • पासपोर्ट साइज फोटो

  • शिधापत्रिका

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT