MCLR Hike: देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँकेने कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. अॅक्सिस बँकेने सीमांत खर्चावर आधारित व्याजदर (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. वाढीव व्याजदर तात्काळ लागू करण्यात आला आहे. देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने वेबसाइटवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, '18 ऑक्टोबर 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 8.10 टक्के होता.'
रेपो दरवाढीनंतर व्याजदरात वाढ झाली
वाहन, पर्सनल आणि गृहकर्जाचे दर एका वर्षाच्या MCLR च्या आधारावर ठरवले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 30 सप्टेंबर रोजी रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतर अॅक्सिस बँकेने MCLR दर वाढवला आहे. एक दिवस ते सहा महिन्यांपर्यंतच्या कर्जावरील MCLR देखील 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.15-8.30 टक्के करण्यात आला आहे.
या बँकांनी व्याजदरही वाढवले
MCLR दोन वर्षांसाठी 8.45 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.50 टक्के असेल. अॅक्सिस बँकेने सांगितले की, 'हे दर पुढील पुनरावलोकनापर्यंत वैध असतील.' याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने MCLR दरात वाढ केली होती. याशिवाय SBI ने मंगळवारी मोठी रक्कम जमा करणाऱ्यांसाठी व्याजदरात 0.3 टक्क्यांनी वाढ केली आहे.
दुसरीकडे, एसबीआयने सोमवारी 10 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या बचत खात्यांवरील व्याज 0.50 टक्क्यांनी कमी करुन 2.70 टक्के केले. एसबीआयने एका निवेदनात म्हटले की, 'आता ग्राहकांना (Customers) 10 कोटी किंवा त्याहून अधिक ठेवींवर 3 टक्के दराने व्याज मिळेल.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.