Pixie Curtis Dainik Gomantak
अर्थविश्व

Success Story: कोट्यावधीच्या कंपन्यांची मालकीन वयाच्या 15 व्या वर्षी होणार रिटायर

Pixie Curtis: पहिल्याच महिन्यात या कंपनीने 1 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त कमाई केली. एवढेच नाही तर पिक्सीची आणखी एक कंपनी आहे. त्याचे नाव पिक्सीज बोज आहे.

Ashutosh Masgaunde

Australia's Pixie Curtis Owner Of Two Companies Will Retire at The Age of 15:

ऑस्ट्रेलियातील एका 12 वर्षांच्या मुलीने उद्योग जगतात मोठी कामगिरी केली आहे. प्राथमिक शाळेत शिकणारी ही मुलगी इतक्या कमी वयात दोन कंपन्यांची मालकिन बनली आहे.

आम्ही बोलत आहोत ऑस्ट्रेलियाच्या पिक्सी कर्टिसबद्दल. पिक्सी कर्टिसने एक खेळणी निर्मितीची कंपनी तयार केली आहे जी प्रचंड नफा कमवत आहे.

पहिल्या 48 तासांत कंपनीचा डंका

Pixie ने तिची आई Roxy Jacenko हिच्या मदतीने Pixie's Fidgets ही खेळणी निर्मितीची कंपनी स्थापन केली. ही कंपनी 2021 मध्ये सुरू झाली आणि पहिल्या 48 तासांत त्यांची सर्व खेळणी विकली गेली.

पहिल्याच महिन्यात या कंपनीने 1 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त कमाई केली. एवढेच नाही तर पिक्सीची आणखी एक कंपनी आहे. त्याचे नाव पिक्सीज बोज आहे.

ही एक हेअर ऍक्सेसरी कंपनी आहे जिची स्थापना पिक्सीच्या आईने केली होती. पिक्सी तेव्हा लहान होती. या दोन्ही कंपन्या आता Pixie's Pix चा भाग आहेत, जे लहान मुलांचे खेळणी आणि अॅक्सेसरीज विकतात.

पिक्सीचा बिझनेस

पिक्सी कर्टिसने 2021 मध्ये तिच्या आईसोबत Pixies Fidgets ही कंपनी सुरू केली होती. या करोडपती मुलीने धनुष्यबाण विकून आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

यानंतर, कोरोना महामारीच्या काळात, तिने आपला फिजेट स्पिनर व्यवसाय सुरू केला आणि कोट्यवधी डॉलर्सचे साम्राज्य उभे केले.

15 व्या वर्षी निवृत्त

पिक्सी कर्टिस ही निवृत्त होणारी सर्वात कमी वयाची मुलगी ठरू शकते. पिक्सी कर्टिस फक्त 12 वर्षांची आहे आणि ती वयाच्या 15 व्या वर्षी निवृत्त होणार आहे.

तिची कंपनी सध्या जोमात असूनही पिक्सीने आभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 15 व्या वर्षी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन अर्थ तज्ञांचे म्हणणे आहे की पिक्सी 15 वर्षांची होईपर्यंत तिची कंपनी पिक्सी बोची एकूण संपत्ती 115 कोटी रुपये होऊ शकते.

इन्स्टाग्रामची राजकुमारी

पिक्सी 2014 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यावेळी तिला सोशल मीडियावर तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इन्स्टाग्रामची राजकुमारी म्हटले जायचे.

पिक्सीच्या आईने पिक्सीचे Instagram अकाउंट तिच्या जन्मानंतर काही दिवसांनी तयार केले होते.

सोशल मीडियावरही हिट

इतक्या लहान वयात मिळालेल्या यशामुळे सोशल मीडियावर पिक्सीची लोकप्रियताही वाढली आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

तिच्या इन्स्टाग्रामवर तुम्ही कधी नजर टाकली तर ती किती महागडी जीवनशैली जगते हे पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

SCROLL FOR NEXT