New technology will replace 40 thousand old ATMs in the country. Dainik Gomantak
अर्थविश्व

एटीएम क्रांती! आता नवे तंत्रज्ञान घेणार देशातील 40 हजार जुन्या ATM ची जागा

New ATMs: या सर्वातून असे दिसून येते की, येत्या काळात देशातील सर्वच सार्वजनिक व खासगी बॅंका ग्राहकांना जास्तीत जास्त व्यवहार शाखेत न येता करता यावे यासाठी आग्रही आहेत.

Ashutosh Masgaunde

ATM Revolution! Now new technology will replace 40 thousand old ATMs in the country:

पुढील १२-१८ महिन्यांत देशभरातील बँकाची एटीएम क्रांती दिसू शकते. यामध्ये सुमारे ४०,००० जुने एटीएम बदलणे आणि उद्योगाच्या अंदाजानुसार सुमारे १०,००० नव्या एटीएमसह नेटवर्कचा विस्तार करण्याचा समावेश आहे.

अर्थिक वर्ष 2023 मध्ये देशातील सर्व शेड्युल्ड बँकांनी एकत्रितपणे 4,452 नवे एटीएम ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. मार्च 2023 च्या शेवटी, RBI डेटानुसार देशात 2,19,513 एटीएम होते.

व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सनी त्यांच्या ATM नेटवर्कचा विस्तार FY23 मध्ये 4,292 ATM ने मार्च 2023 पर्यंत 35,791 केला.

देशातील अनेक एटीएम मशिन्स आता जुने झाले आहेत. त्याच्यातील तंत्रज्ञान जुने झाले आहे. त्यामुळे त्यांना आता नव्या तंत्रज्ञानासह ताजेतवाने करावे लागणार आहे. एटीएम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी संबंधित आता बरेच नवे नियम आले आहेत. त्यामुळे बँकांना जुने एटीएम त्वरीत बदलायला लावले जात आहेत,” अशी माहिती CMS इन्फोसिस्टमचे अध्यक्ष मंजुनाथ राव यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, अर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत, बँकांकडून 15,000 युनिट्स एटीएमची मागणी होती. यातून हे लक्षात येते की, जुने एटीएम बदलण्यावर आणि त्याचे नेटवर्क वाढवण्यावर बॅंका लक्ष केंद्रित करत आहेत.

“खाजगी क्षेत्रातील बँका कॅशलेस सुविधांकडे वळत आहेत. त्या ग्राहकांना पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी शाखेत येण्यासाठी लागणार वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे एकूण परिचालन खर्च कमी होईल," राव यांनी स्पष्ट केले.

राव पुढे म्हणाले, “सार्वजनिक क्षेत्रातील बँकासुद्धा यात फार दूर नाहीत. त्यामुळे, काही प्रमुख सार्वजनिक बॅंकांच्या एटीएम मध्येही, शेजारी-शेजारी, कॅश विथड्राव्हल आणि कॅश डिपॉसीट एटीम बसवलेले दिसत आहे.

एका कॅश विथड्रॉव्हल एटीएमची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये आहे तर कॅश डिपॉजिट एटीएमची किंमत सुमारे 6 लाख रुपये आहे. आता बदलण्यात येणाऱ्या 40 हजार आणि नव्या बसवल्या जाणाऱ्या 10 हजार एटीएम पैकी 25 टक्के एटीएम कॅश डिपॉजिट एटीएम असतील असे गृहीत धरल्यास, बँकांसाठी एकूण भांडवली खर्च सुमारे 2,000 कोटी असू शकतो.

या सर्वातून असे दिसून येते की, येत्या काळात देशातील सर्वच सार्वजनिक व खासगी बॅंका ग्राहकांना जास्तीत जास्त व्यवहार शाखेत न येता करता यावे यासाठी आग्रही आहेत. आणि जुने एटीएम मशीन्स बदलणे आणि नव्या एटीएमचा विस्तार करणे हे त्याच दृष्टीने टाकलेले पाऊल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident Deaths: चिंताजनक! गोव्‍यात 308 दिवसांत तब्‍बल 216 जणांचे बळी; अपघाती मृत्यूंची वाढती संख्या

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेससाठी फॉरवर्ड भूमिका बदलेल?

AFC Champions League: FC Goa भिडणार रोनाल्डोच्या टीमशी! अल नस्सरविरुद्ध परतीचा सामना; सौदी अरेबियन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान

Edberg Pereira Assault: पोलिसांकडून मारहाण झालेल्‍या 'एडबर्ग'ची प्रकृती बिघडली! ICUत केले दाखल; प्रकरण क्राइम ब्रँचकडे सुपूर्द

C K Nayudu Trophy: 17 चौकार, 13 षटकार! 'शिवेंद्र'च्या तडाख्यामुळे गोवा सुस्थितीत; मेघालयाविरुद्ध 270 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT