Ashutosh Masgaunde
धीरज प्रसाद साहू यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1955 रोजी रांची येथे झाला. धीरज प्रसाद सांगतात की ते एका व्यापारी कुटुंबातून आले आहेत.
धीरज साहू हे तीन वेळा राज्यसभेचे खासदार आहेत. 2009 मध्ये ते पहिल्यांदा सभागृहात पोहोचले. यानंतर ते पुन्हा जुलै 2010 मध्ये आणि मे 2018 मध्ये ते तिसऱ्यांदा झारखंडमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले.
धीरज साहू यांचे वडील रायसाहेब बलदेव साहू हे स्वातंत्र्यसैनिक आहेत. बिहारमधील छोटानागपूर येथे जन्मलेल्या रायसाहेब साहू यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. साहू कुटुंब हे स्वातंत्र्यापासून काँग्रेसशी जोडले गेले आहे.
धीरज यांची राजकीय कारकीर्द 1977 मध्ये सुरू झाली. त्यांनी लोहरदगा जिल्हा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
धीरज यांचे भाऊ शिवप्रसाद साहू हेही राजकारणाशी संबंधित आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत, ते रांचीमधून दोनदा खासदार निवडून आले आहेत.
शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर धीरज साहू यांनी बीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचे कुटुंब झारखंडमधील लोहरदगा येथे राहते.
2018 मध्ये त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली तेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 34.83 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते.