Ather Rizta Electric Scooter Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Scooter: सर्वाधिक पसंतीची ई-स्कूटर! 'ही' परवडणारी स्कूटर ठरली भारतीयांची नंबर वन; ओलाला दिला झटका

Ather Rizta Electric Scooter: भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. नवनवीन इलेक्ट्रिक मॉडेल भारतीय बाजारपेठेत विक्रम करत आहेत. या मॉडेलपैकीच एक नवीन मॉडेल म्हणजे एथर रिझ्टा आहे. कंपनीने दावा केला की, या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाने 1 लाख युनिट्सची विक्री ओलांडली आहे.

Manish Jadhav

भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. नवनवीन इलेक्ट्रिक मॉडेल भारतीय बाजारपेठेत विक्रम करत आहेत. या मॉडेलपैकीच एक नवीन मॉडेल म्हणजे एथर रिझ्टा आहे. कंपनीने दावा केला की, या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाने 1 लाख युनिट्सची विक्री ओलांडली आहे. हा टप्पा गाठणाऱ्या काही मोजक्या स्कूटरपैकी ही एक बनली आहे. एथर ही भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर विकणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. तिचे रिझ्टा मॉडेल सर्वाधिक विक्री होणारे आहे.

दरम्यान, एथर रिझ्टा एस मोनो व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 1,10,046 आहे. टॉप मॉडेल एथर रिझ्टा झेड सुपर मॅट 3.7 किलोवॅट प्रति तास व्हेरिएंटची किंमत 1,49,047 (एक्स-शोरुम दिल्ली) आहे. एथर रिझ्टा ही एक फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी भारतीय बाजारपेठेतील (Indian Market) इतर अनेक इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करते. ती ओला एस1 एअर आणि एस1 प्रो, विडा व्ही1 प्रो, टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतकशी स्पर्धा करते. रिझ्टा 5 वैशिष्ट्यांमुळे सर्वाधिक पसंत केली जाते.

डिझाइन

एथर रिझ्टा ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी विशेषतः फॅमिलीसाठी डिझाइन केलेली आहे. तिचा क्लासिक लूक जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. तिची रुंद आणि लांब सीट (900 मिमी) आरामदायी आहे, तर 780 मिमी उंचीची सीट आणि 119 किलो वजन यामुळे ती हलकी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही चालवण्यास सोपी बनते.

स्टोरेज

स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, रिझ्टामध्ये 34 लिटरची मोठी अंडर-सीट स्पेस आहे, जी पूर्ण हेल्मेटसह इतर वस्तू सामावू शकतात. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 22 लिटर फ्रंट स्टोरेज (फ्रंक) आणि रियर टॉप बॉक्स सारख्या अ‍ॅक्सेसरीज देखील जोडू शकता. फोन होल्डर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि बॅगसाठी हुक हे दैनंदिन गरजांसाठी परिपूर्ण बनवतात.

परफॉर्मन्स

परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, एथर रिझ्टा हे Z आणि S या दोन प्रकारांमध्ये येते. Z प्रकारात 4.3 kW मोटर आहे तर S प्रकारात 3.5 kW मोटर आहे. ही स्कूटर फक्त 4 सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग गाठते. तिची टॉप स्पीड 80 किमी/ताशी आहे. यात दोन बॅटरी पर्याय आहेत, 2.9 kWh (123 किमी रेंज) आणि 3.7 kWh (160 किमी रेंज). तसेच, यात SmartEco आणि Zip असे दोन राइड मोड आहेत.

फीचर्स

या शानदार स्कूटरच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, Z व्हेरिएंटमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये नेव्हिगेशन, कॉल/म्युझिक कंट्रोल, चोरीचा अलर्ट यासारखे स्मार्ट फीचर्स आहेत. S व्हेरिएंटमध्ये 5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. स्कूटर ट्रॅक करता येते, लॉक/अनलॉक करता येते आणि एथर अ‍ॅपद्वारे ट्रिप डेटा देखील पाहता येतो.

चार्जिंग

चार्जिंग नेटवर्कच्या बाबतीत एथर ग्रिड हे भारतातील (India) सर्वात मोठ्या ईव्ही चार्जिंग नेटवर्कपैकी एक आहे. रिझ्टा टाइप-2 चार्जर वापरुन 4.5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. ते 5 वर्ष किंवा 60,000 किमी बॅटरी वॉरंटीसह देखील येते, ज्यामुळे पहिल्यांदाच ईव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी एथर एक विश्वासार्ह पर्याय बनते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT