Air India Dainik Gomantak
अर्थविश्व

Price Hike: विमान प्रवाशांना मोठा झटका, तिकीट होणार महाग! महिन्याच्या पहिल्या दिवशी झाला हा बदल

IOC ATF Rate: तुम्हीही अनेकदा विमानाने प्रवास करत असाल तर या बातम्यांबाबत तुम्हाला अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमन्तक

ATF Price Hike Today: तुम्हीही अनेकदा विमानाने प्रवास करत असाल तर या बातम्यांबाबत तुम्हाला अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात विमान तिकिटांच्या किमती वाढू शकतात. खरं तर, नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी झटका दिल्यानंतर, आता एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) वर देखील एक अपडेट आले आहे. तेल कंपन्यांनी एटीएफच्या दरात मोठी वाढ केली आहे. याचा परिणाम आगामी काळात तिकीट दरावर होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी नवीन किमती जाहीर झाल्या

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या किमतीत 4842.37 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत ही किंमत 120,362.64 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. याशिवाय, कोलकात्यात (Kolkata) प्रति किलोलीटर 127,023.83 रुपये, मुंबईत (Mumbai) 119,266.36 रुपये आणि चेन्नईमध्ये 124,998.48 रुपये प्रति किलोलीटर किंमत पोहोचली आहे.

कमर्श‍ियल सिलिंडरमध्ये 115 रुपयांची कपात

मात्र, मंगळवारी सकाळी तेल कंपन्यांकडून कमर्श‍ियल गॅस सिलिंडरच्या किमतीत दिलासा देत 115 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. एअरलाइन्सच्या (Airlines) एकूण खर्चापैकी सुमारे 40 टक्के एटीएफचा वाटा आहे.

मेट्रो शहरांमध्ये ATF च्या किमती

दिल्ली - 120,362.64 रुपये प्रति किलोलिटर

कोलकाता - रु. 127,023.83 प्रति किलोलिटर

मुंबई - 119,266.36 रुपये प्रति किलोलिटर

चेन्नई - 124,998.48 रुपये प्रति किलोलिटर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT