Superpower In field green energy said Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

20 वर्षात भारत 'या' क्षेत्रात महासत्ता बनेल - मुकेश अंबानी

येत्या 20 वर्षांत भारत हा हरित ऊर्जा क्षेत्रात महासत्ता बनेल तसेच भविष्यात भारत हा हरित ऊर्जा निर्यात करू शकणार असेही मत व्यक्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2022 ला संबोधित केले. या समिटमध्ये त्यांनी पर्यावरणातील बदल हा मानवतेसाठी मोठा धोका असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, येत्या 20 वर्षांत भारत हा हरित ऊर्जा क्षेत्रात महासत्ता बनेल तसेच भविष्यात भारत हा हरित ऊर्जा निर्यात करू शकणार असेही मत व्यक्त केले आहे. 2030 पर्यंत भारत देश हा तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आशियाचा जीडीपी हा उर्वरित जगापेक्षा जास्त आहे. स्वच्छ ऊर्जा हा पर्याय नाही, ती गरज आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (Ministry of External Affairs) एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2022 चे आयोजन केले हेते.(Superpower In field green energy said Mukesh Ambani)

भारतासाठी हीच वेळ आहे असेही अंबानी (Mukesh Ambani) म्हणाले, ही. भारत देश हा स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगात अग्रेसर होईल. येत्या 20 वर्षात देशातील तंत्रज्ञान क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. गेल्या काही वर्षांत अक्षय ऊर्जेचा वापर वाढला आहे. अर्थसंकल्पात हरित ऊर्जेबाबतही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, हरित उर्जेमुळे चांगल्या जीवनाचा मार्ग सुकर होईल.

भारतीय उद्योगपतींमध्ये उत्साह

मुकेश अंबानी म्हणाले की, भारतीय उद्योगपतींमध्ये प्रचंड उत्साह आहे. हरित ऊर्जेसाठी निधी देण्याबाबत सरकार गंभीर आहे तसेच सरकार हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. हरित ऊर्जेतील गुंतवणुकीसाठी भारत हा एक आकर्षक पर्याय आहे. भारताने हरित आणि स्वच्छ ऊर्जेमध्ये आपला वाटा वाढवला पाहिजे. हरित ऊर्जेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ही परिषद एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विविध देशांचे परराष्ट्र मंत्री, वरिष्ठ नोकरशहा, उद्योग नेते, डोमेन तज्ञ आणि जागतिक व्यापार आणि आर्थिक तज्ञ उपस्थित आहेत. यामध्ये मुख्य चर्चा कोविड-19 च्या जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील प्रभाव यावर होणार आहे.

ग्लासगो येथे झालेल्या हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, भारत 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन असलेला देश बनेल. याशिवाय 2030 साठी इतर अनेक उद्दिष्टेही निश्चित करण्यात आली आहेत. भारताने 2030 पर्यंत आपली कमी-कार्बन उर्जा क्षमता 500 GW पर्यंत वाढवण्याचे आणि 2030 पर्यंत आपल्या उर्जेच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित

आरआयएलने हरित ऊर्जा व्यवसायाला आकार देण्यासाठी सौर, बॅटरी आणि हायड्रोजन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक भागीदारी केल्या आहेत. कंपनी REC, NexWaf, Sterling & Wilson, Stisal आणि Ambari यांच्याशी एकूण $1.2 अब्ज खर्चासाठी भागीदारी करेल. रिलायन्स मिळवलेल्या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करेल आणि भारतात उत्पादन प्रकल्प उभारेल. रिलायन्स स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठी इंधन सेल्स आणि मुख्य सामग्री यासारख्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल अशी अपेक्षा असल्याचेही सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT