Mumbai To Ahmedabad Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन धावण्याची तयारी जोरात सुरु आहे. यापूर्वी बुलेट ट्रेनच्या कामाच्या प्रगतीबाबत रेल्वेकडून अपडेटही जारी करण्यात आले होते. बुलेट ट्रेन रुळावर कधी धावणार याची अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाट पाहत आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2026 पासून बुलेट ट्रेन सुरु होणार असल्याचे सांगितले होते. रेल्वेकडून या दिशेने वेगाने काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले
सरकारने (Government) या दिशेने अनेक पावले उचलली असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते. रेल्वेमंत्र्यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या भाड्याबाबतही इशारा देण्यात आला होता. एका कार्यक्रमादरम्यान मंत्रिमहोदय म्हणाले होते की, 'बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) भाड्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण ती लोकांपर्यंत पोहोचेल.' बुलेट ट्रेनच्या भाड्यासाठी फर्स्ट एसी हा आधार बनवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. बुलेट ट्रेनचे भाडे फर्स्ट एसीच्या भाड्याच्या आसपास असेल असा अंदाज त्यांच्या बाजूने वर्तवला जात आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यावर भाड्याचा अंतिम निर्णय
बुलेट ट्रेनचे भाडे फ्लाइटपेक्षा कमी असेल आणि सुविधाही चांगल्या असतील, असेही त्यांनी सांगितले होते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच भाड्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या फक्त अंदाज बांधता येतो. प्रथम मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण केला जाईल. त्यानंतरच दुसऱ्या प्रकल्पाचे काम सुरु केले जाईल.
तसेच, सुरत ते बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याचे सरकारने 2026 चे लक्ष्य ठेवले आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ताशी 320 किमी वेगाने बुलेट ट्रेन धावण्याची तयारी सुरु आहे. दोन शहरांमधील 508 किमी अंतर कापण्यासाठी दोन तासांपेक्षा कमी वेळ लागेल. दोन्ही शहरांमध्ये 12 स्थानके असतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.