Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railway: रेल्वेकडून सर्वसामान्यांना खूशखबर, आता धावणार अशी ट्रेन...

Indian Railway: रेल्वेकडून सर्वसामान्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आता रेल्वेने गरीब लोकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

Indian Railway: रेल्वेकडून सर्वसामान्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आता रेल्वेने गरीब लोकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तुम्हीही गरीब असाल आणि ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर भारतीय रेल्वेने एक खास योजना सुरु केली आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस सध्या देशभरात धावत आहे, मात्र तिकीट खूप महाग असल्याने गरीब लोकांना या ट्रेनमधून प्रवास करता येत नाही, त्यामुळे आता रेल्वेने गरिबांसाठी एक योजना सुरु केली आहे. वेगळ्या प्रकारच्या वंदे भारत चालवा, जेणेकरुन गरीब लोकही अशा सुविधांचा लाभ घेऊ शकतील, अशी मागणी करण्यात येत होती.

ही ट्रेन नॉन एसी असेल

सध्या देशाची प्रीमियम ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस आहे, मात्र आता रेल्वे सर्वसामान्यांसाठी सामान्य वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेत आहे. ही नॉन एसी ट्रेन असेल, ज्याचे भाडेही खूप कमी असेल. यासोबतच वंदे भारत ट्रेनप्रमाणेच सुविधाही असतील.

ट्रेनचे नाव काय असू शकते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेनचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनचे नाव वंदे भारतच्या धर्तीवर असू शकते. सध्या याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

2024 पर्यंत सामान्य वंदे भारत येऊ शकेल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारतच्या या आवृत्तीवर चेन्नईतील (Chennai) इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये काम सुरु झाले असून जानेवारी 2024 पर्यंत धावण्याची शक्यता आहे. ही ट्रेन चेअर कारची असेल आणि नंतर ती स्लीपर कारचीही बनवली जाईल. साहजिकच यामध्ये कमी भाडे आकारले जाईल.

स्लीपर वंदे भारत ट्रेन

वंदे भारत ट्रेन ही सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. आतापर्यंत रेल्वेने चेअरकार वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली आहे आणि लवकरच स्लीपर वंदे भारत चालवण्याची रेल्वेची योजना आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनची ऑर्डरही देण्यात आली आहे, जी दूरच्या प्रवासासाठी सुरु करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT