Indian Railways: करोडो रेल्वे प्रवाशांना मोठी भेट, वंदे भारतसह सर्व गाड्यांचे भाडे होणार कमी

Indian Railways Fare Update: तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Indian Railways Fare Update: तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. होय, भारतीय रेल्वेने (Indian Railways) भाड्यात 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही कपात एसी चेअर कार आणि सर्व ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यावर लागू होईल. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाच्या आदेशात सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतचे भाडे कमी करण्याचे म्हटले आहे.

सिट्स रिक्त असल्याचा अहवाल समोर आला

रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशात, रेल्वेच्या त्या झोनमधून ज्या गाड्यांमध्ये गेल्या 30 दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा कमी सीट्स भरल्या गेल्या, त्या गाड्यांमध्ये सवलतीच्या भाड्याची योजना सुरु करण्यासही सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही मार्गांवर वंदे भारत गाड्यांमध्ये सीट्स रिक्त असल्याच्या बातम्या समोर आल्या असताना रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तुलनेने लहान रुटवरील वंदे भारत गाड्यांमधील सीट्स पूर्णपणे भरल्या जात नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

Vande Bharat Express
Indian Railways: रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी भेट, आता ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनमध्ये मिळणार 'ही' सवलत!

भाडेवाढीचा आढावा

यानंतर, भाडेवाढीचा आढावा घेऊन ते आकर्षक करण्याचा विचार रेल्वे करत असल्याची चर्चा होती. या क्रमाने, रेल्वेने एसी चेअर कार आणि सर्व गाड्यांचे एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 25 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.

इंदूर-भोपाळ, भोपाळ-जबलपूर आणि नागपूर-बिलासपूर या वंदे भारत ट्रेनच्या भाड्याचा आढावा घेतला जात असल्याचीही माहिती अलीकडेच समोर आली आहे. या गाड्यांमधील सीट मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत.

Vande Bharat Express
Indian Railways Updates: जून महिन्यात वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेने ट्वीट करत दिली मोठी अपडेट!

केवळ 21 टक्के सिट्स

पीटीआयने जूनपर्यंत दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेनमध्ये केवळ 29 टक्के सिट्स भरल्या होत्या. तर इंदूर-भोपाळ ट्रेनमध्ये 21 टक्के सिट्स आरक्षित होत्या. तीन तास प्रवास करणाऱ्या या ट्रेनमध्ये एसी चेअर कारसाठी 950 रुपये मोजावे लागतात. आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 1,525 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
New passport rules 2026 India
India Nuclear Weapons Report 2026
India Defence Procurement DAC Approves
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com