How to apply for education loan, PMVLK Scheme News, education loan information in Marathi  Dainik Gomantak 
अर्थविश्व

शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा

प्रधान मंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम या योजनेअंतर्गत (PMVLK) तुम्ही एका अर्जावर एकाच वेळी तीन बँकांमध्ये अर्ज करू शकता.

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, परंतु महागड्या फीमुळे तुम्हाला तुमचे मन मारावे लागतं. किंवा तुम्हाला पैशाच्या कमतरतेुळे मनासारखे शिक्षण घेता येत नसेल तर आवडतं क्षेत्र साडून देऊ नका. बॅंक अशा मेहनती मुलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. तेवहा तुम्ही शिक्षणासाठी कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. परंतु शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. (How to apply for education loan?)

उच्च शिक्षणासाठी, फी व्यतिरिक्त, वसतिगृह, लॅपटॉप आणि पुस्तके यासारख्या गोष्टींवर देखील पैसे खर्च केले जातात, त्यामुळे कर्जाची रक्कम हे सर्व खर्च भागवण्यासाठी पुरेशी असणे आवश्यक आहे. सामान्यतः, देशातील अभ्यासासाठी जास्तीत जास्त 10 लाख रुपये आणि परदेशात अभ्यासासाठी 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असते. पण IIT, IIM आणि ISBs सारख्या मोठ्या संस्थांमध्ये तुम्हाला अभ्यासासाठी जास्त कर्ज मिळू शकते. अशा परिस्थितीत, अनेक वित्तीय संस्थांद्वारे तुमच्या अभ्यासक्रमासाठी दिलेल्या शैक्षणिक कर्जाची (Education Loan) तुलना करणे आवश्यक आहे.

तुम्ही कोणत्याही एका बँकेत अर्ज केल्यास आणि शैक्षणिक कर्जाच्या सिंगल विंडो प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा केली तर अधिक चांगले होईल. प्रधान मंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम या योजनेअंतर्गत(PMVLK) तुम्ही एका अर्जावर एकाच वेळी तीन बँकांमध्ये अर्ज करू शकता. या योजनेत 40 बँका नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक कर्जातील वाढती थकबाकी आणि एनपीए लक्षात घेता, बँकांना आता कर्ज मंजुरीच्या वेळी कर्जाची परतफेड सुनिश्चित करायची आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पालक किंवा पालकांसोबत सह-अर्जदार म्हणून अर्ज केला तर तुम्हाला कर्जाची मान्यता मिळण्याची शक्यता वाढते.

जर तुम्ही एज्युकेशन लोन घेत असाल, तर तुम्हाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षानंतर कर्जाची परतफेड करावी लागेल. तुम्ही त्याचा कालावधी जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी वाढवू शकता. त्याची मुदत शैक्षणिक कर्जावरील व्याज कर्ज घेतल्याच्या वेळेपासून सुरू होते. यासोबतच शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15 वर्षांचा कालावधी दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT