Foldable Apple IPhone:अॅपल नेहमीच त्याच्या नवीन आणि अनोख्या डिव्हाइससाठी ओळखला जातो. यातच आता, कंपनी फोल्डेबल स्मार्टफोनच्या जगात पाऊल ठेवणार आहे. अॅपल 2027 पर्यंत त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन आणि ग्लास बॉडी फोन लॉन्च करु शकते. स्मार्टफोनच्या जगात हा फोन गेम चेंजर ठरु शकतो. हे दोन्ही मॉडेल्स केवळ एक नवीन टेक्नॉलॉजीच आणणार नाहीत तर ते अँड्रॉइड फोन उत्पादकांसाठी एक मोठे आव्हान देखील बनू शकतात.
आतापर्यंत सॅमसंग (Samsung) आणि मोटोरोला सारख्या ब्रँडचे फोल्डेबल फोन बाजारात आले आहेत. पण त्यांच्यात एक सामान्य समस्या आहे, स्क्रीनच्या मध्यभागी थोडीशी सी क्रीज तयार होते. रिपोर्ट्सनुसार, अॅपल त्यांच्या फोल्डेबल फोनमध्ये ही सी क्रीज ठेवणार नाही. या फोनची स्क्रीन पूर्णपणे स्मूथ असेल म्हणजेच तुम्हाला अॅपलच्या फोल्डेबल फोनमध्ये जवळजवळ कोणत्याही क्रीज दिसणार नाहीत. मोठ्या स्क्रीनसोबतच या फोनमध्ये iOS चे खास फीचर्स देखील असतील. आयफोनच्या जगात एका नवीन युगाची सुरुवात करणारे डिव्हाइस म्हणून अॅपल याकडे पाहत आहे.
फोल्डेबल फोन व्यतिरिक्त, अॅपल येत्या काळात ग्लाससारखा दिसणारा आयफोन लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये कर्व्ड बॉडी असेल आणि पूर्णपणे नवीन अवतार असेल. एका अर्थाने, तुम्ही त्याला फ्यूचर iPhone म्हणू शकता. या खास मोबाईलचे डिजाइन ट्रांसपेरेंट, स्मूथ आणि प्रीमियम असेल. अॅपल याला आयफोन (IPhone) एक्स प्रमाणेच एक मोठा बदल मानत आहे. 2027 प्रमाणे, आयफोन एक्सने फेस आयडी आणि बेझल-लेस डिझाइन सादर करुन संपूर्ण टेक्नॉलॉजी बदलले. त्याचप्रमाणे, 2027 मध्ये लॉन्च होणारे हे दोन नवीन मॉडेल आयफोनची ओळख पुन्हा परिभाषित करतील.
अॅपलचा फोल्डेबल आयफोन अँड्रॉइड कंपन्यांना टक्कर देणार आहे. आतापर्यंत, अँड्रॉइड कंपन्यांनी फोल्डेबल टेक्नॉलॉजीवर स्वतःला सिद्ध केले आहे. अॅपल आता चांगल्या डिझाइन आणि उच्च दर्जाच्या डिव्हाइससह त्यांच्याशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. अॅपलचे आयओएस सॉफ्टवेअर आणि त्याची नवीन टेक्नॉलॉजी नेहमीच इतर कंपन्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहिले आहे. जर अॅपलचा फोल्डेबल आयफोन अत्याधुनिक फीचर्स आणि चांगला यूजर एक्सपीरियंस घेऊन आला तर तो अँड्रॉइड स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये मोठा गर्दा करु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.