अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या 3,400 कोटी रुपयांच्या सिक्योर बॉन्डचा लिलाव होणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, हे बाँड भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे आहेत, म्हणूनच विमा कंपनीने 11 जुलैपर्यंत एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) आमंत्रित केले आहेत. म्हणजे ज्यांना बाँड खरेदी करण्यात रस आहे, ते 11 जुलैपर्यंत अर्ज करु शकतील. यानंतर लिलाव केला जाईल.
दरम्यान, IDBI Caps ने EoI आमंत्रित करणार्या नोटिसमध्ये याचा उल्लेख केलेला नाही. IDBI कॅपिटल मार्केट्स (IDBI Caps) हे बाँड्सच्या (Bonds) विक्री प्रक्रियेसाठी LIC चे सल्लागार आहेत.
एलआयसीचा दुसरा प्रयत्न
एलआयसीने (LIC) बाँड विकण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिलायन्स कॅपिटल्सच्या बाँड विकण्याचा विमा कंपनीचा हा दुसरा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये, रिलायन्स कॅपिटलच्या 8,091 कोटी रुपयांच्या रोख्यांसह 16 कंपन्यांच्या मालमत्ता पोर्टफोलिओसाठी प्रस्ताव आमंत्रित केले होते. मालमत्तेच्या किंमतीबद्दल एलआयसी आणि बोलीदार यांच्यातील मतभेदांमुळे विक्री झाली नाही.
रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे
अनिल अंबानींच्या रिलायन्स (Reliance) समूहाची कंपनी रिलायन्स कॅपिटल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्याच वेळी, LIC बद्दल बोलायचे झाल्यास, 31 मार्च 2021 पर्यंत, एकूण NPA 7.78% किंवा सुमारे 35,130 कोटी रुपये होता. मे महिन्यात LIC ची शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून शेअर्स जवळपास 40% ने घसरले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.