Google Android 16 Update Dainik Gomantak
अर्थविश्व

गुगल लवकरच लॉन्च करणार Android 16; पहिल्या बीटा व्हर्जनची होणार धमाकेदार एन्ट्री

Google Android 16 Update: अँड्रॉइड यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केटमध्ये लवकरच अँड्रॉइड 16 ची एन्ट्री होणार आहे.

Manish Jadhav

Google Android 16 Update: अँड्रॉइड यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केटमध्ये लवकरच अँड्रॉइड 16 ची एन्ट्री होणार आहे. पहिल्यांदा त्याचे बीटा व्हर्जन येणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर ते सर्व यूजर्ससाठी लॉन्च करण्यात येईल. गुगल त्यांच्या अँड्रॉइड 16 सॉफ्टवेअर अपडेटचे दुसरे बीटा व्हर्जन फेब्रुवारीमध्ये आणि तिसरे बीटा व्हर्जन मार्चमध्ये लॉन्च करु शकते. मात्र, नवीन सॉफ्टवेअरच्या स्टेबल व्हर्जनची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

गुगलचे अँड्रॉइड 16

Android Gerrit वरील पोस्टेड कमेंटनुसार, कंपनी 22 जानेवारी रोजी अँड्रॉइड 16 चे पहिले बीटा व्हर्जन लॉन्च करु शकते. 19 फेब्रुवारी रोजी बीटा 2 लॉन्च होण्याची शक्यता आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा अद्याप गुगलकडून (Google) करण्यात आलेली नाही.

स्टेबल अपडेट कधी येणार?

बीटा 1, 2 आणि 3 च्या लॉन्च टाइमलाइननुसार, कंपनी एप्रिल-मे दरम्यान अँड्रॉइड 16 चे बीटा व्हर्जन 4 लॉन्च करु शकते. त्याचवेळी, त्याचे स्टेबल अपडेट येत्या 6 महिन्यांत येऊ शकते. अँड्रॉइड 15 गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आला होते. अशा परिस्थितीत, अँड्रॉइड 16 च्या लवकरच लॉन्च होण्याच्या वृत्तामुळे यूजर्सच्या (User) अपेक्षा वाढल्या आहेत.

तुम्हाला हे फीचर्स मिळतील

अँड्रॉइड 16 च्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन सॉफ्टवेअर अपडेटमध्ये नवीन व्हॉल्यूम कंट्रोल मिळू शकते. याशिवाय, पूर्वीपेक्षा चांगले UI आणि सुलभता उपलब्ध असेल. कंपनी नवीन ओएसमध्ये हेल्थ रेकॉर्ड, अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट, नवीन सिक्युरिटी फिचर्स आणि प्रायव्हसी ऑप्शन प्रदान करु शकते. अँड्रॉइड 16 पूर्वीपेक्षा चांगली बॅटरी परफॉर्मन्स देखील देऊ शकते.

अँड्रॉइड 16 डेव्हलपर प्रिव्ह्यू

गुगलच्या अँड्रॉइड 16 चा डेव्हलपर प्रिव्ह्यू गेल्या वर्षीच शेअर करण्यात आला होता. या प्रिव्ह्यूमध्ये अनेक शानदार फिचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. फोटो पिकर फीचर, एक्स्ट्रा सिक्युरिटीमध्ये यूजर्सच्या मेडिकल रेकॉर्डसाठी आता अ‍ॅप्सला परवानगी घ्यावी लागेल. प्रायव्हसी कंट्रोल अधिक चांगले असू शकते. यामध्ये नोट्स, स्क्रीन-ऑफ, फिंगरप्रिंट आणि हेल्थ कनेक्ट डेटासाठी शॉर्टकट समाविष्ट असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT