Anant Ambani Appointed Executive Director Dainik Gomantak
अर्थविश्व

Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा बदल! मुकेश अंबानींनी मोठ्या मुलाला सोडून धाकट्याकडे सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

Anant Ambani Appointed Executive Director: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने अनंत अंबानी यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ही नेमणूक १ मे २०२५ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

मुंबई : भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने अनंत अंबानी यांची कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून नियुक्ती केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची ही नेमणूक १ मे २०२५ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, त्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

या आधी अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या भूमिकेत कार्यरत होते. आता, ते थेट कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत, ज्यामुळे कंपनीच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक ठळक राहणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही सध्या देशातील सर्वात जास्त बाजारमूल्य असलेली कंपनी आहे आणि अशा महत्त्वाच्या पदावर अनंत अंबानी यांची नियुक्ती होणे, हे कंपनीच्या पुढील पिढीच्या नेतृत्वाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

याशिवाय, अनंत अंबानी सध्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, तसेच रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेड या रिलायन्स समूहाच्या विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेषतः नवीन ऊर्जा आणि सोलर क्षेत्रात कंपनीने विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहेत.

अनंत अंबानी यांचे मोठे भाऊ आकाश अंबानी हे रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आहेत, जे रिलायन्स ग्रुपच्या टेलिकॉम आणि डिजिटल सेवांच्या शाखेचे नेतृत्व करतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिओने भारतात दूरसंचार क्रांती घडवून आणली असून, जगातील सर्वात मोठ्या डेटा नेटवर्कपैकी एक म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे.

दुसरीकडे, ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालकपदी कार्यरत आहेत. ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सचा रिटेल व्यवसाय वेगाने वाढत असून, देशभरातील शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये आपले जाळे अधिक विस्तारले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

SCROLL FOR NEXT