Anand Mahindra shared most Favourite Photo Of The Year

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

चारचाकीवर ब्रीफकेस, ब्रीफकेसवर अभ्यास आनंद महिंद्रा यांचा वर्षातील आवडता फोटो

आनंद महिंद्रा यांनी 2021 या वर्षातील त्यांचा 'मोस्ट फेव्हरेट' फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी 2021 या वर्षातील त्यांचा 'मोस्ट फेव्हरेट' फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये हातगाडीवर एक ब्रीफकेस ठेवण्यात आली असून त्यावर एक मुलगा बसून अभ्यास करत आहे. यासोबत त्यांनी एक सुंदर संदेश देखील त्यांनी या फोटोतून दिला असून नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, हा माझा वर्षातील सर्वात आवडता फोटो आहे. "मला माहित नाही की तो कोणी क्लिक केला, परंतु तो माझ्या इनबॉक्समध्ये होता. हा फोटो आशा, परिश्रम आणि आशा दर्शवते, जो आपल्या जीवनाचा गाभा आहे ज्यासाठी आपण जगतो. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!" असे कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिले आहे. हा माझा वर्षाचा आवडता फोटो आहे. पण तो कोणी काढला हे मला माहिती नाही त्यामुळे मी त्या फोटोग्राफरला क्रेडिट देवू शकलो नाही. असे म्हणत त्यांनी फोटोग्राफरचाही उल्लेख या ट्विटमध्ये केला.

आनंद महिंद्रा यांनी 2022 मध्ये 'कोरोनापासून मुक्ती' मिळवण्यासाठी त्याचा सर्वात आवडता फोटो शेअर करण्यापूर्वी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'सिंची' चा व्हिडिओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे. पेरूच्या पर्वत रांगेत एका अँडीन कंडोर पक्ष्याला मुक्तपणे सोडल्याचा हा व्हिडिओ आहे.

"या एका व्हिडिओने नवीन वर्षासाठी माझ्या सर्व आशा पल्लवित केल्या आहेत. सिंची, एक अँडीयन कंडोर पक्षाला एका धोकादायक विषाच्या प्रभावापासून वाचवल्यानंतर पेरूच्या पर्वत रांगेजवळ सोडले. कोरोनाने या जगाला 'विष' दिले आहे. आशा आहे की, नवीन वर्ष 2022 मध्ये, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या सर्वांकडे 'सामूहिक पंख' असतील. नवीन वर्षाच्या शुभेच्छा." असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले. आनंद महिंद्रा अनेकदा ट्विटरवर अशा सकारात्मक पोस्ट शेअर करत असतात. ज्या त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT