Amul Product Dainik Gomantak
अर्थविश्व

Amul उतरले ऑरगॅनिक फूड मार्केटमध्ये; मिळणार मिलचे सेंद्रिय पीठ

अमूलच्या मिलचे सेंद्रिय पीठ उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमन्तक

आपण सर्वांनी आत्तापर्यंत अमूल ब्रँडचे दूध, दही आणि आईस्क्रीम चाखून पाहिले असतील. पण, आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही अमूलच्या (Amul Product) गिरणीचे पीठ खाणार आहात. होय, भारतातील दिग्गज अमूलने सेंद्रिय अन्न बाजारात उतरण्याची घोषणा केली. आता तुम्हाला लवकरच बाजारात अमूलचे पीठ मिळणार आहे. कंपनी ऑरगॅनिक पीठ लाँच करून सेंद्रिय अन्न बाजारपेठेत उतरणार आहे तर कंपनीने शनिवारी याची घोषणा केली आहे. (Amul organic food will be available in the market)

GCMMF (गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लि.), अमूल ब्रँड अंतर्गत आपल्या उत्पादनांचे विपणन करणारी एक आघाडीची डेअरी कंपनी, शनिवारी सेंद्रिय गव्हाच्या पिठाच्या लाँचसह सेंद्रिय अन्न बाजारात उतरण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या पोर्टफोलिओमध्ये लाँच केलेले पहिले उत्पादन 'अमूल ऑरगॅनिक होल व्हीट आटा' आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) ने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. याशिवाय, अमूल लवकरच मूग डाळ, तूर डाळ, चना डाळ आणि बासमती तांदूळ ही उत्पादने आपल्या ऑर्गेनिक पोर्टफोलिओमध्ये लॉन्च होणार आहे.

त्रिभुवन दास पटेल मोगर फूड कॉम्प्लेक्समध्ये अमूल सेंद्रिय पिठाचे उत्पादन करण्यात येत आहे. ही उत्पादने भारत सरकारने (Government of India) निश्चित केलेल्या जैविक मानकांनुसार आहेत, ज्यामध्ये अनेक वेळा प्रयोगशाळेतील चाचणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडत असते. आर एस सोढी, एमडी, जीसीएमएमएफ म्हणाले की, सहकारी सेंद्रिय शेतकर्‍यांचा एक पूल विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि सेंद्रिय सोर्सिंगमध्ये विद्यमान दूध मॉडेलची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रक्रियेत देखील आहे.

अमूल संपूर्ण भारतात 5 ठिकाणी सेंद्रिय चाचणी प्रयोगशाळा उभारणार आहेत. अहमदाबादमधील अमूल फेड डेअरीमध्ये पहिली लॅब सुरू केली जाणार आहे. GCMMF ने सांगितले की, सेंद्रिय गव्हाचे पीठ सुरू करण्याचा मुख्य उद्देश त्यांच्या ग्राहकांना अधिक शाश्वत आणि निरोगी जीवनशैलीच्या मिशनवर चालण्यास मदत करणे हे आहे. गुजरातमधील अमूल पार्लर आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अमूल ऑरगॅनिक आटा सुरू होणार आहे.

जूनपासून गुजरात, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुणे येथे होम डिलिव्हरीसाठी हे उत्पादन ऑनलाइन देखील उपलब्ध होणार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 1 किलोची किंमत 60 रुपये आणि 5 किलोची किंमत 290 रुपये असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT