amul md rs sodhi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Amul MD: अमूलचे एमडी आरएस सोढी यांनी अचानक दिला राजीनामा, गेली 12 वर्षे...

Amul News Today: सोढी यांच्या राजीनाम्यानंतर आता GCMMF सीओओ जयन मेहता ही जबाबदारी स्वीकारतील.

दैनिक गोमन्तक

Amul News Today: देशातील प्रत्येक घराघरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या दिग्गज डेअरी कंपनी अमूल (अमूल लिमिटेड) च्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. या बदलानंतर कंपनीचे एमडी आरएस सोढी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोढी यांच्या राजीनाम्यानंतर आता GCMMF सीओओ जयन मेहता ही जबाबदारी स्वीकारतील.

13 वर्षे जबाबदारी सांभाळत होते

सोढी गेली 12 वर्षे ही जबाबदारी सांभाळत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2010 मध्ये त्यांनी अमूल कंपनीत सीनियर मॅनेजर पदावरुन करिअरला सुरुवात केली. त्यांचे काम पाहून कंपनीने त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांसाठी वाढवला.

1982 मध्ये पहिल्यांदा अमूलमध्ये प्रवेश घेतला

आरएस सोधी यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी 1982 मध्ये पहिल्यांदा अमूलमध्ये प्रवेश घेतला होता, त्यानंतर त्यांनी 2000-2004 मध्ये जनरल मॅनेजिंग मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर 2010 मध्ये त्यांना कंपनीच्या एमडीची जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी, जुलै 2022 मध्ये, त्यांना इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आले.

बोर्डाच्या अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला

बोर्डाच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा (Resignation) स्वीकारला आहे. सोढी यांच्या राजीनाम्यानंतर जयन मेहता आता त्यांची जबाबदारी स्वीकारणार आहेत. याआधीही जयन मेहता यांना प्रभारी बनवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT