Amount received after death of EPFO employee will be doubled Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम होणार दुप्पट

जाणून घ्या आता किती निधी मिळणार?

दैनिक गोमन्तक

EPFO कडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी (Employee) एक दिलासादायाक बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंडळाने त्याच्या एक्स-ग्रेशिया डेथ रिलीफ फंडाची रक्कम दुप्पट केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंडळाने या आदेशाची तातडीने अंमलबजावणी केली आहे.

उमा मंडलच्या म्हणण्यानुसार, जर केंद्रीय मंडळाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाला असेल, तर या प्रकरणात 28 एप्रिल 2020 च्या आदेशाचा विचार केला जाईल. मंडळाने सर्व प्रादेशिक कर्मचारी कल्याण समित्यांच्या प्रमुखांना हा आदेश जारी केला आहे. तसेच, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.

अतिरिक्त केंद्रीय पीएफ आयुक्त (HRM) उमा मंडल यांच्या मते, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नॉन-कोविड मृत्यू म्हणजेच नैसर्गिक मृत्यू झाला असेल, तर त्याच्या कुटुंबाला दुप्पट एक्स-ग्रेशिया डेथ रिलीफ फंड मिळेल. ही रक्कम मंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी समान असणार आहे. ही रक्कम कल्याण निधीमधून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

उमा मंडल यांच्या म्हणण्यानुसार, एक्स-ग्रेशिया डेथ रिलीफ फंडाची रक्कम 4.20 लाख रुपयांवरून 8 लाख रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त/अध्यक्ष, केंद्रीय कर्मचारी कल्याण समिती आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्या मान्यतेने वाढवण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातील सदस्याला किंवा वारस ठेवण्यात आलेल्या व्यक्तीला ही रक्कम एक्स-ग्रेशिया डेथ रिलीफ फंडातून दिली जाईल.

यासोबतच, जर हरियाणातील कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या कक्षेत येणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर आश्रित कुटुंबाला कोविड-19 मदत योजनेअंतर्गत मासिक आर्थिक मदत दिली जाईल. मृत विमाधारक कर्मचाऱ्याच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90 टक्के रक्कम दर महिन्याला अवलंबून असलेल्यांना दिली जाईल. हा लाभ मृत व्यक्तीच्या पत्नीला आजीवन किंवा दुसरे लग्न होईपर्यंत, मुलाच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत आणि मुलीला लग्न होईपर्यंत मिळेल. किमान सवलत दरमहा 1,800 रुपये असेल. कामगार आणि रोजगार विभाग सांभाळणारे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी मंगळवारी मृत विमाधारक कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना मदतीचे धनादेश देताना ही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT