Subway Sandwich chain sold to Roark Capital 
अर्थविश्व

अमेरिकेच्या SUBWAY ची मालकी आता रोर्क कॅपिटलकडे, 9.55 बिलियन डॉलरला झाला सौदा

गोमन्तक डिजिटल टीम

Subway Sandwich chain sold to Roark Capital: अमेरिकेतील प्रसिद्ध सँडविचसाठी SUBWAY कंपनीला रोर्क कॅपिटल या कंपनीने खरेदी केले आहे. Roark Capital ने 9.55 बिलियन डॉलरची यशस्वी बोली लावली आहे. नुकतेच याबाबत लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अनेक इक्विटी कंपन्यांनी SUBWAY साठी बोली लावली होती. पण Roark Capital ने बोली जिंकली आहे. SUBWAY ने फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या विक्रीबाबत घोषणा केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, SUBWAY खरेदी करण्यासाठी एकूण तीन कंपन्यांनी 9 बिलियन डॉलरची रुपयांची बोली लावली होती. परंतु टीडीआर कॅपिटल आणि सायकॅमोर कॅपिटलची बोली उशीरा आली तर उर्वरित दोन कंपन्यांनी बोली गमावली.

अखेर रोर्क कॅपिटलने शेवटी SUBWAY ची बोली जिंकली. SUBWAY ची 100 देशांमध्ये 37 हजारांहून अधिक रेस्टॉरंट आहेत. मात्र, या संपूर्ण कराराच्या अटी अद्याप समोर आलेल्या नाहीत.

दरम्यान, SUBWAY सोबत करार पूर्ण झाल्यावर ती कंपनी Roark Capital चेनमधील सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. सध्या रोर्क चेनमध्ये जिमी जोन्स, ऑर्बी, बास्किन रॉबिन्स आणि बफेलो वाइल्ड विंग्ससह अनेक रेस्टॉरंट चेनचे मालक ब्रँड नियंत्रित करतात.

सबवेची 1965 मध्ये ब्रिजपोर्ट कनेक्टिकट येथून सुरुवात झाली. येथेच कंपनीने पहिले आउटलेट Pete's Super Submarine सुरू केले. 17 वर्षीय फ्रेड डेलुका आणि त्याचा मित्र पीटर बक यांनी याची स्थापना केली होती. यावेळी त्यांची Popeyes आणि Chick-fil-A या सारख्या कंपनी सोबत स्पर्धा होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT