Sambhaji Bhide In Goa: महात्मा गांधी जन्माने मुस्लिम, संभाजी भिडेंचे गोव्यात वादग्रस्त वक्तव्य

भारताचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे, गोव्यातून तसा प्रयत्न व्हावा - संभाजी भिडे
Sambhaji Bhide Speech In Goa
Sambhaji Bhide Speech In GoaDainik Gomantak

Sambhaji Bhide Speech In Goa: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गोव्यातील व्याख्यानात विविध वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. महात्मा गांधी जन्माने मुस्लिम असल्यामुळे त्यांना मुस्लिमांचा पुळका होता. तसेच, भारताचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे, गोव्यातून तसा प्रयत्न व्हावा असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी भाषणात केले.

अखिल गोमन्तक हिंदू धर्मसभेकडून आयोजित केलेल्या व्याख्यानात दवर्ली समर्थगड येथे भिडे बोलत होते.

स्वातंत्र्यलक्ष्मी भगवा झेंडा घेऊन लढत तुरूंगात गेली पण स्वातंत्र्य मिळाल्यावर तिच्या खांद्यावर तिरंगा होता. हे काम महात्मा गांधींचे होते. त्यांनी महाराष्ट्राला खुळे केले व देशात हिरो झाले. गांधी जन्माने मुस्लिम असल्यानेच त्यांना मुस्लिमांचा पुळका होता. असे संभाजी भिडे म्हणाले.

भारताचा राष्ट्रध्वज हा भगवाच असला पाहिजे, यासाठी देशभरात फिरणार व प्रचार करणार असल्याचे भिडे यांनी यावेळी भाषणात सांगितले. गोव्यातूनही तसा प्रयत्न व्हावा आणि यासाठी युवकांनी एकत्र यावे असे आवाहन भिडेंनी यावेळी केले.

Sambhaji Bhide Speech In Goa
ख्रिश्चन व्यक्ती शिवरायांच्या मूर्तीची तोडफोड करतो आणि हिंदू उघड्या डोळ्यांनी पाहतात - संभाजी भिडे

त्यापूर्वी 'हिंदू धर्माचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कार्यकाळात लहान मोठी 289 लढाया लढल्या. जगातील 52 पैकी 39 मुस्लिम राष्ट्रांकडून हिंदुस्थानावर आक्रमण करण्यात आले. अत्याचार झाले आणि आता चीन देखील आक्रमणासाठी सज्ज झाला आहे.'

'ख्रिश्चन समाजातील व्यक्ती शिवरायांच्या मूर्तीची तोडफोड करतो आणि हिंदू उघड्या डोळ्यांनी पाहतात. एवढा हिंदू सहनशील आहे.' असे संभाजी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com