जर तुम्हाला OnePlus चे लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 13 आणि 13R खरेदी करायचे असतील तर तुम्हाला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 10 जानेवारीपासून सुरु झाली आहे. आज आपल्याला यावर बंपर डिस्काउंटचा फायदा देखील मिळाला आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दोन्ही फोनपैकी कोणताही फोन खरेदी करु शकता. तुम्हाला यावर खूप चांगली डील मिळत आहे.
अमेझॉनचा (Amazon) वर्षातील पहिला सेल सुरु झाला आहे. ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये, तुम्हाला जवळजवळ सर्व प्रोडक्ट्सवर तगडी सूट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर्सपासून ते बँक ऑफर्सपर्यंत अनेक ऑफर्स आहेत. तुम्ही या डीलचा फायदा लवकरच घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला आयफोन, वनप्लस आणि पोकोचे लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळत आहे. चला तर मग यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया...
जर तुम्ही OnePlus 13 घेण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय कुठेतरी योग्य ठरु शकतो. या फोनमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळत आहेत. अमेझॉन देखील तो स्वस्तात खरेदी करण्याची संधी देत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 72,999 रुपये आहे. पण या Amazon सेलमध्ये तुम्हाला तो फक्त 69,998 रुपयांमध्ये डिस्काउंटसह मिळत आहे. जर तुम्ही एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देऊ शकत नसाल, तर प्लॅटफॉर्म तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील देत आहे. तुम्ही हा फोन 3,394 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करु शकता. याशिवाय, तुम्ही सिलेक्ट क्रेडिट कार्डवर देखील ऑफरचा लाभ घेऊ शकता. या फोनमध्ये 6.82 इंचाचा डिस्प्ले आहे. त्यातील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे.
या Amazon सेलमध्ये, तुम्हाला iPhone 16 वर देखील शानदार डील मिळत आहे. तुम्ही हा फोन फक्त 74,900 रुपयांना डिस्काउंटसह खरेदी करु शकता. जर तुम्हाला तो EMI वर खरेदी करायचा असेल तर मासिक EMI फक्त 3,631 रुपये असेल. येथे तुम्हाला नवीन आयफोनचे सर्व कलर पर्याय मिळत आहेत. एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
तुम्हाला स्मार्टफोन अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्हाला लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 75 टक्क्यांपर्यंत आणि फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे, तुम्ही सेलमध्ये इतर प्रीमियम स्मार्टफोन्सवर देखील उत्तम डील मिळवू शकता. ही विक्री सोमवारपासून (13 जानेवारी) सुरु झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.