Amazon-Flipkart च्या Replacement Policy मध्ये मोठा बदल, आता 'हे' प्रोडक्ट्स होणार नाहीत परत

Amazon-Flipkart ने आता डिजिटल उत्पादनांवरील 7 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी थांबवली आहे. आता घरबसल्या वस्तू बदलण्याची सोय नसेल.
Amazon, Flipkart
Amazon, FlipkartDainik Gomantak
Published on
Updated on

Amazon-Flipkart has changed the 7 Days Replacement Policy to 7 Days Service Center Replacement on their e-commerce website:

आजकाल प्रत्येकजण ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देतो. यामागील एक कारण म्हणजे तासन्तास बाजारात फिरावे लागत नाही. वस्तू घरपोच मिळतात आणि दुसरीकडे बाजारपेठेपेक्षा स्वस्त किमतीत उत्पादने इथे मिळतात.

ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी येथे अनेक प्रकारच्या ऑफर देखील दिल्या जातात.

दरम्यान, आता बातम्या येत आहेत की ई-कॉमर्स वेबसाइट Amazon-Flipkart ने आपल्या बदली धोरणात मोठा बदल केला आहे. होय, असा बदल जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Amazon-Flipkart ने त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर 7 Days Replacement Policy बदलून 7 Days Service Centre Replacement अशी केली आहे.

Amazon-Flipkart ने आपल्या रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला ती वस्तू खरेदी केल्यानंतर बदलण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Amazon, Flipkart
ChatGPT ला टक्कर देण्यासाठी देशी Hanooman AI, 11 स्थानिक भाषांमध्ये सुरू होणार सेवा

यापूर्वी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर, जेव्हा प्रत्येक उत्पादन तुमच्यापर्यंत पोहोचवले जात असे, ते सदोष किंवा तुटलेले आढळल्यास, तुम्ही ते त्वरित बदलू शकायचा. दोन्ही प्लॅटफॉर्मवर रिप्लेसमेंटसाठी 7 दिवसांपर्यंत वेळ असायचा.

या सुविधेचा लोकांना खूप फायदा झाला. एखाद्याला डिलिव्हरी केलेल्या वस्तूंमध्ये काही दोष आढळल्यास, शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तक्रार करण्याची सोय होती. तसेत बदलण्याची किंवा परत करण्याची विनंती करता यायची, परंतु आता असे होणार नाही.

Amazon, Flipkart
2 मार्चला शेअर बाजारात विशेष Trading Session का? NSE ने सांगितला संपूर्ण प्लॅन

डिजिटल उत्पादनांवरील रिप्लेसमेंट पॉलिसी

आता जर एखादी सदोष वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तर ती बदलण्यासाठी तुम्हाला ती वस्तू विकणाऱ्या कंपनीच्या सेवा केंद्रात जावे लागेल.

Amazon-Flipkart ने आता डिजिटल उत्पादनांवरील 7 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी थांबवली आहे. आता घरबसल्या वस्तू बदलण्याची सोय नसेल. त्याचबरोबर आता तुम्हाला घरी बसून वस्तूंची देवाणघेवाण करण्याची सुविधा मिळणार नाही. या दोन्ही प्लॅटफॉर्मने त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर 7 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी बदलून 7 दिवसांची सर्व्हिस सेंटर पॉलिसी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com