alert your whatsapp account will be hacked as soon as you dial this number Dainik Gomantak
अर्थविश्व

सावधान! 'हा' नंबर डायल करताच तुमचे व्हॉट्सॲप होईल हॅक

हल्ली हॅकर्स व्हॉट्सॲप अकाउंटला हॅकर युजर्सचा बळी बनवत आहेत

दैनिक गोमन्तक

इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप घोटाळ्याशी संबंधित प्रकरणेही समोर येत आहेत. तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हल्ली हॅकर्स व्हॉट्सॲप अकाउंटला हॅकर युजर्सचा बळी बनवत आहेत. आता तुम्हाला व्हॉट्सॲपवर पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधाही मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला तुमच्या खात्याचे तपशील सेव्ह करावे लागतील. अशा परिस्थितीत, जर तुमचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाले, तर तुमचे बँक खातेही क्षणार्धात रिकामे होऊ शकते.

अलीकडेच, Cloudsek.com चे संस्थापक राहुल सासी यांनी व्हॉट्सॲप घोटाळ्याबाबत काही मोठे खुलासे केले आहेत. एका नवीन ओटीपी फसवणुकीची माहिती देताना राहुलने दावा केला आहे की याद्वारे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक केले जात आहे. Cloudsek.com ही AI आधारित कंपनी आहे. जी वापरकर्त्यांना सायबर धोक्यांपासून सावध करते. कंपनीचे संस्थापक राहुल म्हणतात की, सायबर गुन्हेगार तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर सहज प्रवेश मिळवू शकतात. राहुलने ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.(alert your whatsapp account will be hacked as soon as you dial this number)

व्हॉट्सॲपअकाउंट हॅक करणे

राहुलच्या म्हणण्यानुसार, हॅकर्स आता व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबत आहेत. हॅकर्स व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी कॉल करतात आणि नंतर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने विशिष्ट नंबरवर कॉल करण्यास सांगतात. जर वापरकर्त्याने त्या नंबरवर कॉल केला तर हॅकर्स त्याचे खाते पूर्णपणे ओव्हरटेक करतात.

व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच घटना नाही, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्येही ओटीपीद्वारे व्हॉट्सॲप हॅक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. राहुल सांगतात की, बाजारात घोटाळ्याच्या इतरही अनेक पद्धती आहेत ज्याद्वारे हॅकर्सना तुमच्या खात्यात पूर्ण प्रवेश मिळू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT