Akasa Air Twitter/Akasa Air
अर्थविश्व

Akasa Air तिकिटांचे बुकिंग सुरु , असे करावे तिकीट बुक

Akasa Airline Ticket Booking: राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa Air ने त्यांच्या फ्लाइट तिकिटांचे बुकिंग सुरु केले आहे.

दैनिक गोमन्तक

आकाश एअरमध्ये उड्डाण करण्यासाठी सज्ज व्हा, स्टॉक मार्केटचे बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी Akasa Air चे समर्थन केले. कारण कंपनीने त्यांच्या फ्लाइट तिकिटांचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने आपल्या फ्लाइटसाठी तिकीट बुकिंग सुरू झाल्याची माहिती सोशल मिडीयावर दिली आहे. यामुळे प्रवासी आता त्यात प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करू शकतात. (Akasa Airline Ticket Booking News)

* कंपनीने ट्विटद्वारे माहिती दिली
आकाश एअरने ट्विट (Twitter) करत माहिती दिली की, आकाश एअरमध्ये उड्डाण करणारे पहिले प्रवासी बनण्यासाठी आणि फ्लाइटचे तिकीट बुक करण्यासाठी http://akasaair.com या साईडला भेट द्या किंवा प्ले स्टोअरवर जाउन त्याचे अॅप डाउनलोड करा.

Akasa Air फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी akasaair.com ला भेट द्या.
वन वे किंवा राउंड ट्रिप निवडा.
From पासुन ते to पर्यंत कॉलम भरावे.
जर तो वन वे असेल तर फक्त डिपार्चर डेट सेलेक्ट करा
जर राउंड ट्रिप असेल तर डिपार्चर डेट सह रिटर्न डेट सेलेक्ट करावी.
प्रवाशांची माहिती द्या, किती प्रौढ किंवा लहान मुले जात आहेत.
तुमच्याकडे कोणताही प्रोमो कोड असल्यास, तुम्ही संबंधित कॉलममध्ये भरून हवाई तिकिटांवर सूट मिळवू शकता.

Akasa Air ला 7 जुलै रोजी ऑपरेटर प्रमाणपत्र मिळाले
एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर DGCA ने 7 जुलै रोजी उड्डाण करण्यासाठी Akasa Air Air Operator Certificate दिले आहे. त्यानंतर एअरलाईन जुलैच्या अखेरीस त्यांचे व्यावसायिक उड्डाण ऑपरेशन पुन्हा सुरू करू शकतील. Akasa Air चे Proving Flight अनेक वेळा उड्डाण नियामक DGCA चे समाधान करण्यासाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवले. विमान कंपन्यांचे अधिकारी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांसोबत प्रवासी म्हणून प्रवास करत होते. यासोबतच क्रेबिन क्रू मेंबरही होते.

Akasa चे पहिले Boeing 737 MAX विमान 21 जून रोजी दिल्लीत आले

21 जून 2022 रोजी Akasa Air चे पहिले विमान Boeing 737 MAX दिल्ली विमानतळावर उतरले. हे विमान 16 जून रोजी अमेरिकेतील सिएटल येथे अकासा एअरला सुपूर्द करण्यात आले. Akasa Air चे MD आणि CEO विनय दुबे म्हणाले की, Akasa Air हे अलिकडच्या वर्षांत भारतीय उड्डाण क्षेत्रातील प्रगतीचे प्रमुख उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT