Airtel Dainik Gomantak
अर्थविश्व

एअरटेलने यूजर्सला दिला झटका, रिचार्ज प्लॅनमधून काढून टाकली ही मोठी सेवा

भारती एअरटेलने (Airtel) यूजर्संना मोठा झटका दिला आहे.

दैनिक गोमन्तक

भारती एअरटेलने यूजर्संना मोठा झटका दिला आहे. कंपनीने त्यांच्या बहुतेक प्रीपेड प्लॅनमध्ये आढळलेली Amazon Prime Video Mobile Edition ट्रायल टाकली आहे. एअरटेल थँक्स बेनिफिट्स अंतर्गत कंपनी 2021 पासून ही सुविधा देत आहे. रिचार्ज प्लॅनसह, वापरकर्त्यांना अॅमेझॉन प्राइम मोबाइलची एक महिन्याची विनामूल्य ट्रायल देण्यात आली. ज्याद्वारे वापरकर्ते चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही शोचा आनंद घेऊ शकत होते. (airtel big set back removes prime video mobile edition trial)

या योजनांमधून प्राइम व्हिडिओ ट्रायल काढून टाकली आहे

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, आता फक्त दोन एअरटेल (Airtel) प्रीपेड प्लॅन शिल्लक आहेत, ज्यामध्ये Amazon Prime Video Mobile Edition ची मोफत ट्रायल दिली जात आहे. या प्लॅनची किंमत 359 रुपये आणि 108 रुपये आहे. 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज मिळतात. प्लॅनमध्ये मोफत HelloTunes, Wink Music आणि Xtreame मोबाइल (Mobile) पॅकसह प्राइम व्हिडिओ मोफत ट्रायल 28 दिवसांसाठी ऑफर केली जात आहे.

शिवाय, 108 रुपयांचा प्लॅन डेटा पॅक आहे. या पॅकची वैधता तुमच्या सध्याच्या प्लॅनवर अवलंबून असेल. प्लॅनमध्ये फक्त 6 GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय मोफत HelloTunes, Wink Music आणि Prime Video ची 30 दिवसांची मोफत ट्रायल दिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

SCROLL FOR NEXT