Air India Dainik Gomantak
अर्थविश्व

Air India: परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर, एअर इंडियाने केली मोठी घोषणा

Air India New Flight: लंडन, बर्मिंगहॅम आणि सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Air India New Flight: लंडन, बर्मिंगहॅम आणि सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमचा प्रवास सुकर होणार आहे. वास्तविक, एअर इंडिया पुढील आठवड्यात या शहरांसाठी 20 नवीन उड्डाणे सुरु करत आहे. खुद्द एअर इंडियाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, एअर इंडिया (Air India) पुढील तीन महिन्यांत बर्मिंगहॅम, लंडन (London) आणि सॅन फ्रान्सिस्कोसाठी 20 अतिरिक्त साप्ताहिक उड्डाणे सुरु करणार आहे. टाटांच्या मालकीची एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उपस्थिती मजबूत करण्याची योजना आखत आहे, ज्या अंतर्गत ही उड्डाणे सुरु केली जात आहेत.

कंपनीने दिलेली माहिती

एअर इंडियाने शुक्रवारी एक निवेदन जारी करुन सांगितले की, कंपनी पुढील आठवड्यात 20 नवीन उड्डाणे सुरु करणार आहे. बर्मिंगहॅमसाठी पाच अतिरिक्त उड्डाणे, लंडनसाठी नऊ अतिरिक्त उड्डाणे आणि सॅन फ्रान्सिस्कोसाठी सहा अतिरिक्त उड्डाणे आठवड्यात सुरु केली जातील. यासोबतच ग्राहकांना दर आठवड्याला 5,000 हून अधिक अतिरिक्त सिट्स देण्यात येणार आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्यांच्या सुविधा वाढणार आहेत.

फ्लाइट्सची संख्या वाढेल

सध्या, एअर इंडिया यूकेसाठी दर आठवड्याला 34 उड्डाणे संचलित करते. कंपनीच्या या घोषणेनंतर फ्लाइट्सची संख्या 48 होणार आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एअर इंडियाची आता सात भारतीय शहरांमधून ब्रिटनच्या (Britain) राजधानीपर्यंत थेट उड्डाणे असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवी नाईकांचे विनोद

Goa Crime: भरघोस व्याजाच्या आमिषाने दाम्पत्याला 16 लाखांचा गंडा, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Carambolim: 'गरीब अडचणीत येतील, गावाचा विनाश होईल'! करमळीत ‘मेगा प्रोजेक्ट’ला विरोध; ग्रामसभेत ठराव

Cyber Crime: ऑनलाईन गंडा; गोवेकरांचे 73 लाख पाण्‍यात! आर्थिक फसवणुकीच्‍या 903 घटना घडल्‍या

Goa Crime: 'तुमच्यासाठी पार्सल आहे' म्हणून बाहेर बोलावले, साखळी हिसकावून पळाला; गुजरातच्या कुख्यात चोरट्याला अटक

SCROLL FOR NEXT