Air India Hiring Dainik Gomantak
अर्थविश्व

Air India Hiring: एअर इंडियात पायलट होण्याची संधी, कंपनीकडून 1,000 पादासाठी जाहिरात प्रसिद्ध

टाटा समूह एअर इंडियाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे, ज्यासाठी नवीन विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे.

Pramod Yadav

Air India Hiring: टाटा समूहाची एअरलाइन्स एअर इंडिया 1000 वैमानिकांची नियुक्ती करणार आहे. एअर इंडिया कॅप्टन आणि ट्रेनर या पदांसाठी भरती करणार आहे. जागतिक पायलट दिनानिमित्त एअर इंडियाने भरतीची जाहिरात दिली आहे. टाटा समूह एअर इंडियाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे, ज्यासाठी नवीन विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे, त्यामुळे आता एअरलाइन्स मोठ्या प्रमाणावर पायलटची भरती करणार आहेत.

एअर इंडियाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, एअरलाइन्स 1,000 वैमानिकांची नियुक्ती करणार आहे. एअर इंडिया A320, B777, B787 आणि B737 फ्लीटसाठी कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि टेनर्स या पदांसाठी भरती करत आहे. एअरलाइन्स त्यांच्या ताफ्यात 500 नवीन विमाने भरणार आहे. अलीकडेच, एअर इंडियाने बोईंग आणि एअरबसला वाइड बॉडी विमानांसह नवीन विमानांसाठी ऑर्डर दिली आहे. सध्या 1800 पायलट एअर इंडियाशी जोडले आहेत.

भारतीय नागरिकांसह परदेशात राहणारे भारतीय नागरिकही या पदासाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेत ट्रेनी पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.

याशिवाय, सायकोमेट्रिक चाचणी, वैयक्तिक मुलाखत, सिम्युलेटर फ्लाइट प्रवीणता चाचणी, प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट, अर्जदारांसाठी पार्श्वभूमी पडताळणी चाचणी देखील असेल. अर्जदार कोणत्याही माहितीसाठी aigrouphiring@airindia.com या मेल आयडीवर मेल करू शकतात.

एअर इंडियाच्या वैमानिकांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांना वेतन रचनेत सुधारणा करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयानंतर हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. एअर इंडियाच्या 1,500 हून अधिक वैमानिकांनी वैमानिकांच्या चिंतेकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. एअर इंडियाच्या पायलट युनियन, इंडियन पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट्स गिल्ड (IPG) यांनी वैमानिक आणि केबिन-क्रू सदस्यांसाठी वेतनवाढीची मागणी नाकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT