Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: 'या' राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा 13 वा हप्ता

PM Kisan Samman Nidhi Yojana Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Yojana Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सप्टेंबरमध्ये देशातील सुमारे 8.5 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरु केली होती. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

तोमर यांनी योजनेशी संबंधित एक मोठे अपडेट दिले

नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी या योजनेशी संबंधित एक मोठी अपडेट दिली आहे. छत्तीसगडमधील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप भुलेख पडताळणी आणि ई-केवायसी केलेले नाही. पीएम किसानमध्ये होणारा गोंधळ थांबवण्यासाठी केंद्राकडून कठोर पावले उचलली जात आहेत. पुढील हप्ता मिळविण्यासाठी भुलेख पडताळणी आणि ई-केवायसी आवश्यक आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले होते की, छत्तीसगडमधील (Chhattisgarh) 27,43,708 शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत सक्रिय आहेत.

19,75,340 शेतकऱ्यांची भुलेख पडताळणी

ते पुढे म्हणाले होते की, केवळ 19,75,340 शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता मिळू शकेल. उर्वरित शेतकऱ्यांनी अद्याप भुलेख पडताळणी आणि केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर एखाद्या शेतकऱ्याने भुलेख पडताळणी आणि ई-केवायसी केले नसेल तर त्याला 13 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. पीएम किसानशी संबंधित कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 155261 वर कॉल करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT