Air India Deal: इंडिगोनंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने विमानांची मोठी खरेदी केली आहे. एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगकडून 470 विमाने खरेदी करण्यासाठी करार केला.
पॅरिस एअर शोच्या दुसऱ्या दिवशी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारासाठी, एअर इंडियाने सूचीबद्ध किंमतीवर सुमारे $70 अब्ज डॉलर्समध्ये 470 विमाने खरेदी करण्याचा करार केला.
टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीच्या एअरलाइनने फेब्रुवारीमध्ये सांगितले होते की, ते दोन्ही विमान उत्पादकांकडून वाइड-बॉडी विमानांसह एकूण 470 विमाने खरेदी करणार आहेत. या ऑर्डरमध्ये 34 A350-1,000, सहा A350-900, 20 बोईंग 787 ड्रीमलाइनर्स आणि 10 बोईंग 777X वाइडबॉडी विमाने, 140 एअरबस A320neo, 70 Airbus A321neo आणि 190 बोइंग स्मॉल एअरक्राफ्टचा समावेश आहे.
दरम्यान, या खरेदीच्या करारावर पॅरिस एअर शोपासून स्वतंत्रपणे स्वाक्षरी करण्यात आली. एअर इंडियाने सांगितले की हा करार फेब्रुवारीमध्ये घोषित केलेल्या $70 अब्ज फ्लीट विस्तार कार्यक्रमातील पुढील टप्पा आहे. एअर इंडियाला (Air India) एक वर्षानंतर Airbus A350 सह नवीन विमानांचा पुरवठा सुरु करेल. कंपनीने सांगितले की, 2025 च्या मध्यापासून विमानांची खेप मिळण्यास सुरुवात होईल.
टाटा सन्स आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, "या ऐतिहासिक निर्णयामुळे एअर इंडियाची दीर्घकालीन यशाची स्थिती मजबूत झाली आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.