Afghan-Taliban War will affect on Indian Business Dainik Gomantak
अर्थविश्व

तालिबान्यांचा अफगाणिस्तानवर कब्जा, भारताच्या व्यापारावर होणार मोठा परिणाम

अफगाणिस्तान (Afghanistan) आणि भारत (India) यांच्यातील द्विपक्षीय व्यापारावर लक्षणीय परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमन्तक

काबुल (Kabul) तालिबानच्या (Taliban) हाती गेल्यानंतर या अनिश्चित काळात अफगाणिस्तान (Afghanistan) आणि भारत (India) यांच्यातील द्विपक्षीय व्यापारावर लक्षणीय परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, अफगाणिस्तानमधील (Afghan-Taliban War) राजकीय उलथापालथ पाहता देशांतर्गत निर्यातदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.(Afghan-Taliban War will affect on Indian Business)

अजय सहाय म्हणाले की या परिस्थितीमुळे व्यवसायावर परिणाम होईल. अफगाणिस्तानमधील वाढती अनिश्चितता व्यापार कमी करेल. FIEO चे माजी अध्यक्ष आणि देशातील आघाडीचे निर्यातदार एसके सराफ यांनीही द्विपक्षीय व्यापार कमी होईल असे सांगितले. त्यांना आमच्या उत्पादनांची गरज असल्याने आम्ही सर्वकाही गमावू शकत नाही, असे सराफ म्हणाले आहेत.

अफगाणिस्तानचे भविष्य आता अनिश्चिततेकडे जात आहे, कारण काबुल तालिबानच्या ताब्यात देण्यापूर्वीच राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी देश सोडला. एफआयईओचे उपाध्यक्ष खालिद खान म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याने व्यापार ठराविक काळासाठी पूर्णपणे ठप्प होईल.

" अफगाणिस्तान हा जमिनेने व्यपलेला देश आहे आणि हवाई मार्ग हा या देशाच्या निर्यातीचा मुख्य मार्ग आहे आणि आता तो विस्कळीत झाला आहे,"खान म्हणाले. अनिश्चितता कमी झाल्यानंतरच व्यवसाय पुन्हा सुरू होईल. साई इंटरनॅशनलचे मालक आणि अफगाणिस्तानमधील निर्यातदार राजीव मल्होत्रा ​​म्हणाले की, भारतातून निर्यात पूर्णपणे थांबेल कारण आता वेळेवर पैसे देण्याचा मुद्दा महत्त्वाचा असेल.

अफगाणी लोक भारतात सुक्या मनुका, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट्स, पिस्ता, सुक्या जर्दाळू आणि जर्दाळू, चेरी, टरबूज आणि औषधी वनस्पती आणतात. भारताची त्या देशाकडे जाणारी शिपमेंटमध्ये चहा, कॉफी, मिरपूड आणि कापूस यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT