तालिबानने गुलामीचे बंधन तोडले: पाकिस्तान

Afghanistan: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेले वक्तव्य जगाची चिंता वाढवणार असल्याचे दिसते आहे.
Pakistan's Prime Minister Imran Khan has said that the Taliban have broken the shackles of slavery
Pakistan's Prime Minister Imran Khan has said that the Taliban have broken the shackles of slaveryDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी आता अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या सत्तांतरणावर आपली प्रतिक्रीया दिल्याचे पहायला मिळते आहे. अफगाणिस्तानवर तालिबान ताबा मिळवण्याला 'गुलामगिरीच्या जोखडांतुन मुक्तता' झाली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेले वक्तव्य जगाची चिंता वाढवणार असल्याचे दिसते आहे. पाकिस्ताच्या अफगाणिस्तानला समर्थन मिळाल्याने जगासाठी आणि भारतासाठी देखील मोठ्या प्रमाणत डोकेदुखी ठरु शकते. जगभरात होणाऱ्या अतिरेकी कारवायांसाठी अफगाणिस्तान हे दहशतवादाचे तळ होऊ शकते. (Pakistan's Prime Minister Imran Khan has said that the Taliban have broken the shackles of slavery)

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) काना-कोपऱ्यांमध्ये होणाऱ्या अतिरेकी कारवायांमधून समोर येणाऱ्या तालिबानने (Taliban) आता थेट देशाची राजधानी काबुल (kabul) पर्यंत पोहोचत, थेट राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काल देश सोडून पलायन केल्यानंतर देश आता तालिबान्यांच्या ताब्यात गेला, या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसुन येतय. या सर्व वातावरणातच चीन या प्रकरणावर काय भुमिका घेणार, याकडे सर्व जगाचे लक्ष लागुन असतानाच चीनने तालिबानसोबत मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan's Prime Minister Imran Khan has said that the Taliban have broken the shackles of slavery
चीनचा तालिबानला पाठींबा? जगासाठी ठरु शकते डोकेदुखी

तालिबानने सुरु केलेल्या सत्तासंघर्षाबद्दल चीनने शांत राहण्याची भुमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे. अफगाणिस्तानच्या शेजारीच असणारा चीन या प्रकरणावर काय भुमिका घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबुन असणार आहेत. महासत्ता होण्याच्या प्रयत्नात असेलेल्या चीनचे अमेरिकेशी असलेली स्पर्धा हा सर्व घडामोडींमधला महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे चीनने तालिबानशी मैत्रीपुर्ण संबंध जर प्रस्थापित केले तर तो, अमेरिका, भारत आणि जगासाठी डोकेदुखी ठरु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com