आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आता हेल्थकेअर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी, अदानी डायग्नोस्टिक चेन मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड मधील बहुसंख्य भागभांडवल खरेदी करण्याचा विचार करत आहेत. वेबसाइट लाइव्ह मिंटने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मिंटच्या मते, अब्जाधीश गौतम अदानी आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लिमिटेड डायग्नोस्टिक चेन मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि. मधील बहुसंख्य स्टेक घेण्यासाठी बोलीचे मूल्यांकन करत आहेत. (Adani Group Will Enter In Healthcare Sector Adani Apollo Bid For Stake In Metropolis)
डील किती होऊ शकते ते जाणून घ्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोपोलिसचे मार्केट कॅप आणि देशभरातील त्याच्या ऑपरेशन्सचा विचार करता कराराचा आकार किमान $1 अब्ज (₹7,765 कोटी) असू शकतो. यापूर्वी देखील मिंटने अहवाल दिला होता की, अदानी समूह आरोग्य सेवा क्षेत्रात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. यासाठी, अदानी समूह मोठी रुग्णालये (Hospital), डायग्नोस्टिक चेन आणि ऑफलाइन आणि डिजिटल फार्मसी दोन्ही घेऊ शकेल.
अदानी 4 अब्ज डॉलर खर्च करु शकते
अदानी समूहाने हेल्थकेअर क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी व्यवसायासाठी $4 बिलियन पर्यंतची तरतूद केली आहे. तसेच, समूह दीर्घकालीन निधी योजना तयार करण्यासाठी गुंतवणूकदार आणि कर्जदारांशी चर्चा करत आहे. मात्र, मेट्रोपोलिस आणि अदानी समूहाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
मेट्रोपोलिसचा इतिहास काय आहे
अदानी समूह हा भारतातील (India) सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक आहे. ज्याचा वार्षिक महसूल $20 बिलियन पेक्षा जास्त आहे. अदानी समूहाने इतर उद्योगांसह ऊर्जा, हरित ऊर्जा, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया आणि विमानतळ (Airport) या व्यवसायात प्रवेश केला आहे. मेट्रोपोलिसने 1980 च्या दशकात एकल प्रयोगशाळा म्हणून सुरुवात केली आणि 2005 मध्ये खाजगी इक्विटी फर्म ICICI व्हेंचर्सकडून ₹35 कोटींचा पहिला बाह्य निधी प्राप्त झाला. यानंतर PE फर्म वॉरबर्ग पिंकसकडून $85 दशलक्ष मिळाले, ज्याने ICICI व्हेंचरमधून बाहेर पडण्यास मदत केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.