जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; गौतम अदानी, झेलेन्स्की, पुतिन यांचा समावेश

100 Most Influential People: टाईम मॅगझिनने 2022 मधील जगातील टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली
100 Most Influential People
100 Most Influential PeopleDainik Gomantak
Published on
Updated on

जगातील टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी टाईम मॅगझिनने जाहीर केली आहे. या यादीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि मिशेल ओबामा यांची नावे समाविष्ट आहेत. या यादीत काश्मिरी कार्यकर्ते खुर्रम परवेझ, उद्योगपती गौतम अदानी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील करुणा नंदी यांचेही नाव आहे. (100 Most Influential People News)

या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Jo Biden) , अमेरिकन राजकारणी केविन मॅककार्थी, रॉन डेलांटिस यांच्यासह अनेक अमेरिकन (America) राजकीय व्यक्तींच्या नावांचाही समावेश आहे. तसेच या यादीत सर्वात तरुण प्रभावशाली व्यक्तींचे नाव Eileen Gu आहे, तर सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नावात फेथ रिंगगोल्डचे नाव आहे. फ्रीस्टाइल स्की स्टार Eileen चे वय 18 वर्षे आहे, तर लेखक फेथ रिंगगोल्ड यांचे वय 91 वर्षे आहे.

याशिवाय 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे नाव समाविष्ट आहे. यावर्षीच्या यादीत त्यांचा समावेश झाल्याने जिनपिंग 13व्यांदा या यादीत सामील झाले आहेत. याशिवाय जो बायडन, क्रिस्टिन लगार्ड, टिम कुक हे पाचव्यांदा या यादीत सामील झाले आहेत.

100 Most Influential People
जिनपिंग यांच्या तैवानबाबत लीक झालेल्या योजनेमुळे हादरली अमेरिका, वाचा संपूर्ण प्रकरण

* खेळाडूंच्या नावांमध्ये पाहूया कोणाचा समावेश

या मासिकात पीट डेव्हिडसन, अमांडा सेफ्रीड, सिमू लिऊ, मिला कुनिस, ओप्रा विन्फ्रे, अशा अनेक दिग्गज चेहऱ्यांना मनोरंजन क्षेत्रात स्थान देण्यात आले आहे. अॅलेक्स मॉर्गन, नॅथन चेन, कँडेस पार्कर, आयलीन गु, अॅलेक्स मॉर्गन, मेगन रॅपिनो आणि बर्की सॉरब्रुन या खेळाडूंचीही नावे या यादीत समविषट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com