Gautam Adani | Adani Group
Gautam Adani | Adani Group  Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group vs Hindenburg: अखेर हिंडनबर्ग रिसर्चच्या प्रश्नांना अदानी ग्रुपने दिली उत्तरे

Akshay Nirmale

Adani Group vs Hindenburg: अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहातील कंपन्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. हिंडेनबर्ग कंपनीने अदानी समुहाला 88 प्रश्न विचारले होते. पण त्याची उत्तरे अदानी समुहाने दिली नव्हती. आता अदानी समुहाने ही उत्तरे दिली आहेत.

हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपचे स्टॉक्स शेअर बाजारात सलग दोन दिवस कोसळले होते. 25 जानेवारीनंतर तीन ते चार दिवसात अदानी ग्रुपचे 48 बिलियन डॉलरचे नुकसान झाले होते. त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर घसरले होते.

अदानी ग्रुपने म्हटले आहे की, हिंडेनबर्ग रिसर्चने विचारलेल्या 88 प्रश्नांपैकी 21 प्रश्न असे आहेत की त्याची उत्तरे कंपनीने 2015 पासून वेगवेगळ्या सार्वजनिक कागदपत्रांमधून दिली आहेत.

हा अहवाल दिशाभूल करणाऱ्या तथ्यांवर आधारित असून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे अदानी समूहाने स्पष्टपणे म्हटले आहे. वास्तविक हिंडेनबर्ग रिसर्चचे हे प्रश्न कंपनीच्या व्यवहारांबद्दल, DRI (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) आणि कोर्टातील खटल्याबद्दल आहेत.

अदानी समूहाने 'मिथ्स ऑफ शॉर्ट सेलर' या सादरीकरणाद्वारे या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अदानी समूहाने सांगितले आहे की त्यांच्या 9 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 8 चे बड्या 6 ऑडिटर्सनी ऑडिट केले आहे. कंपन्यांवर करण्यात आलेल्या ओव्हर लिव्हरेज्डच्या आरोपावर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले आहे.

महसूल आणि ताळेबंदाबाबत अदानी समूहाने म्हटले आहे की, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सूचीबद्ध केलेल्या 9 कंपन्यांपैकी 6 कंपन्या अशा आहेत की त्यांचे महसूल, खर्च आणि भांडवली खर्चासाठी विशिष्ट नियामक पुनरावलोकन केले जाऊ शकते.

गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर समूहाने म्हटले आहे की, शेअर बाजार जेव्हा चांगली कामगिरी करत असतो तेव्हा त्यात अदानीच्या कंपन्यांचा वाटा 7 टक्के असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT