Adani Group acquires 49% hold in Maharashtra Border Check Post Network Limited aap92 Dainik Gomantak
अर्थविश्व

अदानी ग्रुपची महाराष्ट्राच्या या बड्या कंपनीत कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड (Maharashtra Border Check Post Network Limited) ही कंपनी एकीकृत पोर्टफोलिओ आहे

दैनिक गोमन्तक

अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड (Adani Group) ची संपूर्ण मालकीची उपकंपनी अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड (Adani Road Transport limited) ने सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाची उपकंपनी महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड (Maharashtra Border Check Post Network Limited) घेण्याचा करार केला आहे. अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड (ARTL) कंपनी जी देशातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांचे बांधकाम, विकास, संचालन आणि व्यवस्थापन पाहते ती कंपनी महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड मध्ये जवळपास 49 टक्के हिस्सा घेणार आहे. नियामक मंजुरीच्या अधीन राहून अतिरिक्त भाग घेण्याचा पर्याय असेल.(Adani Group acquires 49% hold in Maharashtra Border Check Post Network Limited)

हे उल्लेखनीय आहे की हे अधिग्रहण 1680 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर आहे. यासंदर्भात, एआरटीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा प्रकाश माहेश्वरी यांनी म्हटले आहे की, भारताने आपले रस्ते जाळे तयार करण्यात आणि राष्ट्राला जोडण्यात प्रचंड प्रगती केली असून जे आर्थिक विकासात आवश्यक योगदान देणारा घटक आहे. माहेश्वरी पुढे म्हणाले की, देशातील सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर खेळाडू म्हणून, अदानी समूहाचे रस्ते नेटवर्कचे जागतिक दर्जाचे पोर्टफोलिओ तयार करण्याची मोहीम भारतातील सर्वात मोठी रस्ता पायाभूत सुविधा मालक आणि ऑपरेटर बनण्याच्या आमच्या मिशनशी जुळलेली आहे.

महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड ही कंपनी एकीकृत पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये किमान 2033 पर्यंत महाराष्ट्रातील आणि बाहेरच्या सर्व रहदारी मार्गांसाठी व्यावसायिक वाहनांमधून विशेष सेवा शुल्क संकलनाचे अधिकार आहेत.

दरम्यान, अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक एनएसईवर मागील सत्राच्या 1,437 रुपयांच्या बंदच्या 6.50 किंवा 0.45 टक्क्यांनी घसरून 1,430.50 रुपयांवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

SCROLL FOR NEXT