तुम्हाला माहिती आहे का आता तुमच्या डेबिट (Debit Card) आणि क्रेडिट कार्डवर (Credit Card) तुम्हाला मोफत विमा मिळत आहे. हा विमा विविध प्रकारच्या कार्डांवर रु. 10 लाखांपर्यंतचा आहे. हा अपघाती विमा (Accidental Insurance) असून, विमा संरक्षण मास्टरकार्ड (Mastercard) , रुपे कार्ड (RuPay card) , व्हिसा कार्डच्या कंपन्यांकडून ग्राहकांना दिला जातो किंवा या कंपन्या बँकांच्या (Bank) सहकार्याने मोफत विमा (Insurance) संरक्षण प्रदान करतात. जर कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास त्यावेळी या विम्याचा लाभ मिळू शकेल .
या अपघाती विम्याची (Accidental Insurance) किंमत किती असेल, हे तुम्ही कोणते कार्ड वापरत आहात यावर अवलंबून आहे. ही रक्कम वेगवेगळ्या कार्डसाठी (Card) बदलते. एसबीआयच्या (SBI) वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एसबीआय (SBI) गोल्डसाठी दोन लाख रुपये, प्लॅटिनम कार्डसाठी (Platinum Card) पाच लाख रुपये, प्राइड कार्डसाठी (Pride Card) दोन लाख रुपये, प्रीमियम कार्डसाठी (Premium Card) पाच लाख रुपये आणि व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्ड आणि मास्टरकार्डसाठी (Mastercard) पाच लाख रुपये विमा (Insurance)संरक्षण आहे. हा विमा संरक्षण 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे.
हे कार्ड (Card) वापरण्यासाठी काही अति आणि नियम सांगिल्या आहेत. अपघाताच्या 90 दिवस पूर्ण होण्यापूर्वी वापरावे. तसे न झाल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही. जर कार्ड धारकाचा विमान अपघातात मृत्यू झाला असेल तर विमा संरक्षण जवळजवळ दुप्पट होईल. परंतु यासाठी कार्ड एयर तिकीट बूकिंगमध्ये वापरण्यात आलेले असणे आवश्यक आहे.
याशिवाय डेबिट कार्डवर (Debit Card)पर्चेज प्रोटेक्शनचा (Purchase Protection) देखील लाभ मिळतो. जेव्हा तुम्ही त्या कार्डने (Card) खरेदी केली असेल आणि 90 दिवसाच्या आत ती वस्तु तुमच्या कारमधून किंवा तुमच्या घरातून चोरीला जाईल तेव्हा त्याचा फायदा मिळेल. एसबीआय गोल्डसाठी 5000 रुपये, प्लॅटिनम कार्डसाठी 50,000 रुपये, एसबीआय प्राइडवर 5000 रुपये, प्रीमियम कार्डवर (Card) 50,000 रुपये आणि व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डवर (Debit Card) 1 लाख रुपयांचे पर्चेज प्रोटेक्शन मिळतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.