देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांनी नवीन उद्योजकांना मदत करण्याच्या उद्देशाने स्टार्ट-अपसाठी निधी उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे (DPPIT) अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल यावर म्हणाले की, लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया स्टार्ट-अपने वित्तपुरवठ्याच्या हेतूने एक पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल स्टार्टअप सल्लागार परिषदेच्या बैठकीत हे मुद्दे समोर आले आहेत. (A Big financial support from LIC to the new Startup's)
तसेच अग्रवाल म्हणाले की, देशातील स्टार्ट-अप्सची इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी अनेक पुढाकार घेतले जात आहेततसेच या क्षेत्रासाठी सुमारे 16 कार्यक्रम आखले गेले आहेत आणि ते परिषदेच्या सर्व सदस्यांसह सामायिक केले गेले आहेत. अग्रवाल यांनी असेही सांगितले की सॉफ्टबँक इंडियाचे प्रमुख मनोज कोहली यांना याबाबतचा राष्ट्रीय संवर्धन कार्यक्रम चालवायचा आहे.
ते म्हणाले की,नॅशनल स्टार्टअप सल्लागार परिषदेच्या बैठकीत एलआयसीचे अध्यक्षही उपस्थित होते. त्यांनी स्टार्ट-अपसाठी निधी उभारण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगतिले आहे. ईपीएफओनेही स्टार्ट-अपसाठी समान गुंतवणूक निधी उभारण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही अग्रवाल यावेळी म्हणाले.
एलआयसीच्या आयपीओचा देखील मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनुसार, जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने सामान्य विमा व्यवसाय कायदा, 1972 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली होती. यासह, खाजगी कंपन्या विमा क्षेत्रात स्थापन झालेल्या सरकारी विमा कंपन्यांमध्ये सहभागी होऊ शकतील. एलआयसीमधील आपला हिस्सा विकण्यासाठी सरकारने ही मान्यता दिली असल्याचे समजत आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने एलआयसीच्या सुरुवातीच्या आयपीओ च्या आधी मूळ मूल्य ठरवण्यासाठी मिलिमन अॅडव्हायझर्स एलएलपी इंडिया या एक्चुरियल कंपनीची नियुक्ती केली होती. एलआयसीच्या आयपीओ भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ म्हटले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.