8th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर लवकरच तुमच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.
नॅशनल पेन्शन व्यवस्थेबाबत देशात ज्या प्रकारची चर्चा सुरु आहे, त्याच दरम्यान, सरकार लवकरच देशभरात आठवा वेतन आयोग लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
8व्या वेतन आयोगाला मोदी सरकार लवकरच ग्रीन सिग्नल देऊ शकते. आठवा वेतन आयोग या वर्षी म्हणजेच 2023 मध्येच स्थापन केला जाणार आहे.
7 वा वेतन आयोग 2013 मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि 2016 मध्ये लागू करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली होती.
आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Employees) आनंदाची बातमी येऊ शकते. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी दर 10 वर्षांनी लागू केल्या जातात.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार लवकरच 8 व्या वेतन आयोगाची घोषणा करु शकते. पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्याआधी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याचा सरकारचा विचार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये ते 56,900 रुपये प्रति महिना आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ होणार आहे. यासोबतच वेतन आयोगाच्या अहवालातील फिटमेंट फॅक्टरही वाढू शकतो.
8 व्या वेतन आयोगाच्या मागणीबाबत युनियन लवकरच सरकारशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात येत आहे.
त्याचबरोबर यासाठी शासनाला निवेदनही देण्यात येणार आहे. सरकारने (Government) मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यास, युनियन आंदोलनाचा विचार करु शकते, ज्यामध्ये केंद्रीय कर्मचारी तसेच माजी निवृत्ती वेतनधारक सहभागी होऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.