Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: सावधान! पगार वाढीच्या आमिषाला बळी पडू नका, WhatsApp वर फिरतोय 8व्या वेतन आयोगाचा 'फेक' मेसेज; गृह मंत्रालयाचा अलर्ट

8th Pay Commission Salary Calculator Scam: सध्या सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲपवर ‘सॅलरी कॅल्क्युलेटर’ किंवा ‘सॅलरी कॅल्क्युलेट’ या नावाने मेसेज वेगाने व्हायरल होत आहेत.

Manish Jadhav

8th Pay Commission Salary Calculator Scam: 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी समोर आली आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार नेमका किती वाढणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, याच जिज्ञासेचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीचे एक नवीन जाळे विणले आहे. गृह मंत्रालयाची सायबर सुरक्षा विंग असलेल्या ‘सायबर दोस्त’ने या संदर्भात अधिकृत इशारा जारी केला असून कर्मचाऱ्यांना कोणत्याही अनोळखी लिंक किंवा फाईल्सपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

सध्या सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲपवर ‘सॅलरी कॅल्क्युलेटर’ किंवा ‘सॅलरी कॅल्क्युलेट’ या नावाने मेसेज वेगाने व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, सोबत दिलेली फाईल डाऊनलोड करुन कर्मचारी 8व्या वेतन आयोगानुसार आपल्या वाढीव पगाराचा अचूक अंदाज लावू शकतात. या मेसेजसोबत सायबर चोर एक 'APK' (Android Package Kit) फाईल पाठवतात. विश्वासार्ह वाटावे यासाठी या फाईलला पगाराशी संबंधित नाव दिलेले असते. मात्र, ही फाईल म्हणजे प्रत्यक्षात एक धोकादायक मालवेअर किंवा व्हायरस आहे.

जेव्हा एखादा कर्मचारी उत्सुकतेपोटी ही फाईल डाऊनलोड करुन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो, तेव्हा त्याच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा नकळतपणे सायबर चोरांकडे जातो. हे बनावट ॲप इन्स्टॉल होताच तुमच्या फोनमधील खाजगी माहिती, बँक तपशील, कॉन्टॅक्ट्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँकेचे ओटीपी चोरण्याचे काम सुरु करते. एकदा का गुन्हेगारांना या माहितीचा अ‍ॅक्सेस मिळाला की, काही क्षणांतच तुमच्या बँक खात्यातील कष्टाची कमाई लंपास केली जाते.

सायबर तज्ज्ञांनी आणि सरकारी यंत्रणांनी हे स्पष्ट केले की, केंद्र सरकार किंवा कोणताही विभाग कधीही व्हॉट्सॲप सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे सॉफ्टवेअर किंवा अ‍ॅप्सची फाईल पाठवत नाही. कोणत्याही अनधिकृत स्त्रोताकडून अ‍ॅप डाऊनलोड करणे तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरु शकते. वेतन, पेन्शन किंवा वेतन आयोगाशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती मिळवण्यासाठी केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा. 8व्या वेतन आयोगाबाबतचे अधिकृत अपडेट्स पाहण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या पोर्टलवरच विश्वास ठेवावा.

जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर (WhatsApp) किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे संशयास्पद मेसेज आले, तर त्यावर क्लिक करण्याची चूक करु नका. असे मेसेज त्वरित डिलीट करा आणि ते इतरांना फॉरवर्ड करणे टाळा. तसेच, आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांनाही या नव्या सायबर फ्रॉडबद्दल जागरुक करा. डिजिटल युगात तुमची थोडीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते. लक्षात ठेवा, सुरक्षित राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनोळखी लिंक्स आणि अ‍ॅप्सपासून सावध राहणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT